शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे पाणी शेतात शिरल्याने जमिनीचे नुकसान

By admin | Updated: June 15, 2017 19:33 IST

कारपा : येथुन जवळच असलेले भिलडोंगर येथील शेतकरी गोविंद सिताराम पवार यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारपा : येथुन जवळच असलेले भिलडोंगर येथील शेतकरी गोविंद सिताराम पवार यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले . भिलडोंगर ते कोलार  या रोडचे काम चालु असुन अर्धवट पुलामुळे  सदर पावसाचे पाणी शेतामध्ये घुसुन पेरणीयोग्य असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निवेदन तहसीलदार मानोरा यांना दिले आहे. तसेच या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे सुध्दा नुकसान आहे.कोलार ते भिलडोगर रस्ता कामाचे डांबरीकरण काम चालु असून शेतकरी गोविंद पवार यांच्या गट नं.४०७ ला लागुन रोडच्या पुलाचे काम चालु आहे. पवार यांनी वारंवार पुलाचे काम लवकर म्हणजे पावसाळ्यापुर्वी करण्यात यावे असे संबंधीत ठेकेदार मालपाणी सुपरवायझर निरंजन चव्हाण यांना सांगुनही काम रखडल्यामुळे जोरदार झालेल्या पावसाने अर्धवट पुलामुळे सरळ पाणी शेतात घुसल्याने ऐन पेरणीच्या दिवसात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यापुढे मोठे संकट आले आहे . तर झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी व दोषीवर कारवाई करावी अश्ी मागणी गोविंद पवार यांनी मानोरा तहसीलदार व मानोरा पोलिस स्टेशनला   निवेदनाव्दारे केली  आहे. वरील रोडचे काम मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत चालु  आहे. त्याचप्रमाणे यांनी चालु असलेल्या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यानेच शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे कळते. तेव्हा संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोडच्या कामाची तसेच नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करुन शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.