शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री

By admin | Updated: July 26, 2014 22:30 IST

घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधरित्या साठा करून त्याची काळ्या बाजारात जादा दराने विक्री केली जात आहे.

मानोरा : घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधरित्या साठा करून त्याची काळ्या बाजारात जादा दराने विक्री केली जात आहे. तसेच गॅसकिटवर चालणार्‍या वाहनांना रिफिलिंग करून देण्याचा व्यवसायही तेजीत आला आहे. ग्रामीण भागातील सिलिंडरधारकांचे कार्ड गोळा करून मिळणार्‍या सिलिंडरची उचल केली जात आहे. याशिवाय एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तीच्या नावाने स्वतंत्र रेशनकार्ड तयार करण्यात आले आहे. अनेकांनी वेगवेगळ्या नावाने गॅसचे कार्ड गोळा केले आहे. वर्षभरात १२ सिलिंडर एका कार्डावर दिले जातात. नेमक्या याच बाबीचा फायदा घेऊन गॅसकीटवर चालणार्‍या वाहनात सिलिंडरमधील गॅस रिफिलिंग करून दिले जाते. यासाठी ६00 ते ७00 रूपये आकारले जातात. सिलिंडर असले तरी कार्ड नसल्याने अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दरात गॅस सिलिंडर घ्यावे लागते. मानोरा शहरात गॅस एजन्सी नसल्याने ग्राहकांना दिग्रस, मंगरूळपीर, दारव्हा, कारंजा येथून गॅस आणावे लागते. एजन्सीने त्यांना घरपोच गॅस द्यावयास पाहिजे पण तसे न होता काही दलाल हे काम करीत आहे. बहुतांश ठिकाणी भरलेले सिलिंडर तत्काळ मिळते. मात्र येथे मात्र टंचाई भासविली जाते. काळ्या बाजारात मात्र गॅस नियमित उपलब्ध असते. अवैधरित्या साठा करून हजारोची कमाई एजन्सीला हाताशी धरून काही लोक करीत आहे. आरटीओ विभागाकडूनही गॅस सिलिंडरवर चालणार्‍या वाहनाची तपासणी केली जात नाही. अनधिकृतरित्या गॅस कीट लावली असलेली वाहने अनेक आहेत. त्यात घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस रिफिलिंग करून वापरला जातो याबाबत पुरवठा निरिक्षण अधिकार्‍यांशी संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकला नाही