शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्हिटी रेट केवळ सात टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST

वाशिम : साधारणत: १५ फेब्रुवारी २०२१ नंतर जिल्ह्यात आलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ३२ हजार ३४४ नव्या ...

वाशिम : साधारणत: १५ फेब्रुवारी २०२१ नंतर जिल्ह्यात आलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ३२ हजार ३४४ नव्या रुग्णांची भर पडली. दरम्यान, संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लादलेले कडक निर्बंध आणि त्यास नागरिकांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे कोरोनाबाधितांचा आलेख हळूहळू खाली येत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. गेल्या सात दिवसांत २८ हजार ४८० लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात केवळ २०२४ कोरोनाबाधित आढळून आले. पॉझिटिव्हिटी हा रेट केवळ सात टक्के आहे.

जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोना संसर्गाच्या संकटास सुरुवात झाली. तेव्हापासून १५ फेब्रुवारीपर्यंत संसर्गाने बाधित रुग्णांचा एकूण आकडा केवळ ७ हजार ३३९ होता; मात्र त्यानंतर आलेल्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. गेल्या साडेतीन महिन्यांच्या काळात ३२ हजार ३४४ नव्या रुग्णांची भर पडून २८ मे २०२१ अखेर बाधितांचा आकडा ३९ हजार ६८३ वर पोहोचला. या काळात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या वाढून ४५१ झाली आहे. यामुळे जिल्हाभरात भीतिदायक वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, जिल्ह्यावर ओढवलेल्या या संकटाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून जिल्हाभरात कडक निर्बंध लागू केले. आरोग्य विभागानेही प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णांना कोरोनाच्या दाढेतून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे.

कोरोना विषाणू संसर्गासंबंधी २२ मे ते २८ मे या सात दिवसांचा विचार केल्यास कोरोनाचे संकट हळूहळू ओसरत चालल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. यादरम्यानच्या काळात आरोग्य विभागाने जिल्ह्यात एकूण २८ हजार ४८० लोकांच्या चाचण्या केल्या. त्यात केवळ २०२४ नवे रुग्ण निष्पन्न झाले; तर २६ हजार ४५६ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्या तुलनेत सात दिवसांत ३३०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना पॉझिटिव्हिटीचा हा सरासरी रेट केवळ ७ टक्के असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

..................

बाॅक्स :

रुग्णसंख्येत घट; पण टळले नाही संकट

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत दैनंदिन बाधित आढळणाऱ्या रुग्णांची संख्या सरासरी ३०० पेक्षा अधिकच होती; मात्र गेल्या काही दिवसांत हा आकडा कमी झाला आहे. त्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी संकट अद्याप पूर्णत: टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

...............

३९,६८३

कोरोनाबाधितांची एकूण संख्या

४५१

कोरोनाने आतापर्यंत झालेले मृत्यू

२८,४८०

गत सात दिवसांतील चाचण्यांची संख्या

२,०२४

आढळलेले नवे रुग्ण

३३०५

लोकांना मिळाला ‘डिस्चार्ज’

.....................

‘ऑक्सिजन, व्हेंटिलेटर’वर केवळ १३८ रुग्ण

गेल्या काही दिवसांपूर्वी ‘ऑक्सिजन’ आणि ‘व्हेंटिलेटर’वर ठेवाव्या लागणाऱ्या कोरोनाबाधितांचा आकडा ५०० पेक्षा अधिक झाला होता; मात्र आता हे प्रमाणही कमी झाले असून, २९ मे अखेर ऑक्सिजनवर १२०; तर व्हेंटिलेटरवर केवळ १८ रुग्ण उपचार घेत आहेत.