शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना वाढला; सॅनिटायझरचा वापर मात्र घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST

जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. मे महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ ...

जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. मे महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत गेली. सुरुवातीच्या काळात कोरोनापासून बचावाकरिता तोंडाला मास्क लावण्यासह हात सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ करण्याकडे नागरिकांनी विशेष लक्ष केंद्रित केले. काही सजग नागरिकांच्या तर खिशातच सॅनिटायझरची शिशी ठेवली जायची. अशात सॅनिटायझरच्या अतिरिक्त वापराने हात शुष्क झाल्याच्याही तक्रारी व्हायला लागल्या. गेल्या काही महिन्यांपासून तर सॅनिटायझरचा वापर झपाट्याने घटल्याचे दिसून येत आहे.

...........

कोरोना विषाणू संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात मास्क आणि सॅनिटायझरची प्रचंड प्रमाणात मागणी होती. एप्रिल २०२० पासून काहीच महिन्यात जिल्ह्यात सॅनिटायझर विक्रीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. आता मात्र कोरोना वाढला असतानाही १० ते १५ टक्क्यांनी सॅनिटायझरची विक्री घटलेली आहे.

बाजारपेठेत विविध कंपन्यांचे सॅनिटायझर उपलब्ध आहे. मध्यंतरीच्या काळात विक्री पूर्णत: ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून मात्र काही प्रमाणात ग्राहकांकडून मागणी व्हायला लागल्याने सॅनिटायझर उपलब्ध करण्यात आले. बहुतांश नागरिक सॅनिटायझरऐवजी आता हात स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करीत असल्यानेही विक्रीत १० ते १५ टक्क्यांनी घट झालेली आहे.

............

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरची विक्री वाढणार, या अपेक्षेने औषध विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात ‘स्टॅाक’ केला; परंतु विक्रीत सुमारे १५ टक्के घट झाली आहे.

- राजेश पाटील शिरसाट,

अध्यक्ष, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन

.........

मागील वर्षीची विक्री

८० टक्के

या वर्षीची सॅनिटायझरची विक्री

३० टक्के

मास्क विक्रीत

४० टक्के

झाली घट

............

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया

कोरोनापासून बचावासाठी हात वारंवार स्वच्छ करणे आवश्यक आहे; मात्र सॅनिटायझरने हाताची त्वचा शुष्क पडते. त्यामुळे त्याचा वापर टाळून साबण किंवा डेटाॅलने हात धुण्याचा पर्याय निवडला आहे.

- धनंजय गाभणे

............

मागील वर्षी कोरोनापासून बचावाकरिता हाताला सॅनिटायझरचा नियमित वापर केला; मात्र त्याची जणू सवयच पडली होती. यामुळे कालांतराने ‘स्किन’च्या समस्या जाणवायला लागल्या. आताही सॅनिटायझर वापरत आहे; परंतु त्याचे प्रमाण कमी केले आहे.

- अतुलकुमार शर्मा