लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी पाच जणांचा मृत्यू तर, ४४७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ५ मे रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३०,०२१ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार आणखी पाच जणांचा मृत्यू झाला तसेच ४४७ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम तालुक्यात १३७, मालेगाव तालुक्यातील ७४, रिसोड तालुक्यातील ६६, मंगरुळपीर तालुक्यातील ३३, कारंजा तालुक्यातील ५८ आणि मानोरा तालुक्यात ४६ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ३३ बाधितांची नोंद झाली असून, ३५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने बुधवारी केले.
Corona Cases in Washim : आणखी पाच जणांचा मृत्यू; ४४७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 10:51 IST