शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रेत्यांचा संप यशस्वी

By admin | Updated: May 31, 2017 01:06 IST

आॅनलाइन औषध विक्रीवर निर्बंध लादा : विक्रेत्यांची प्रमुख मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बेकायदेशीर आॅनलाइन फार्मसीच्या माध्यमातून सुरू असलेल्या औषध विक्रीवर तत्काळ निर्बंध लादावे, या मुख्य मागणीसाठी ‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट’ने पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्हाभरातील ५५० औषध विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला असून, आपापली दुकाने बंद ठेवली आहेत. या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा येथील केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी केला आहे.सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बेकायदेशीर आॅनलाइन फार्मसीच्या माध्यमातून नार्कोटिक्स, ड्रग्ज, झोपेची औषध, गर्भपाताच्या गोळ्या, कोडीन सिरप यासारख्या अनेक धोकादायक औषधींची विक्री केली जात असल्याचे अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने शासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. मात्र, या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. यासह केंद्र शासनाच्या स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पब्लिक नोटिसलाही औषध विक्रेता संघटनेचा विरोध असल्याने ३० मे रोजी हा संप पुकारण्यात आला होता. या संपात जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते १०० टक्के सहभागी झाले होते, असा दावा संघटनेने केला. दरम्यान, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वाशिम शहरात १० मेडिकलमधून अत्यावश्यक परिस्थितीसाठी औषधे उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली होती. औषध विक्रेत्यांच्या संपामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्यावतीने जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांनी आपल्या आधिपत्याखालील सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या होत्या. त्यानुसार औषध साठा ठेवण्यात आला.