शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शेलूबाजार बाजारपेठेत ग्राहकसंख्या रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:56 IST

गतवर्षी दमदार पाऊस झाल्याने सर्व धरणे, पाझर तलाव भरले व नद्या-नाले काठोकाठ भरले. सिंचनासाठी मुबलक पाणी मिळाल्याने रब्बी पिकेही ...

गतवर्षी दमदार पाऊस झाल्याने सर्व धरणे, पाझर तलाव भरले व नद्या-नाले काठोकाठ भरले. सिंचनासाठी मुबलक पाणी मिळाल्याने रब्बी पिकेही जोमदार आहेत. यामुळे बाजारपेठ गजबजून जाण्याची अपेक्षा होती; परंतु फेब्रुवारी महिना उलटत आला तरी, शेलूच्या बाजारपेठेत ग्राहकांची संख्या वाढलीच नाही. कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वानंतर ४० खेडी जोडलेली ही बाजारपेठ पूर्णपणे मंदावली आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या शेलू बाजारच्या आठवडी बाजारात यात्रोत्सवांच्या काळात हिवाळ्याच्या मध्यंतरानंतर मोठी गर्दी पाहायला मिळते. येथील आठवडी बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे बाजारकरुंना चालताही येत नाही; परंतु दर बुधवारी भरणारा हा आठवडी बाजारही ओस पडत असल्याचे दिसते. या ठिकाणी अगदी बोटावर मोजण्याएवढेच ग्राहक रस्त्याने ये-जा करत असल्याचे चित्र दिसते. दरम्यान, गतवर्षी ऐन लग्नसराईच्या काळात कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. त्यामुळे अनेक वधू-वर पित्यांनी लग्नसोहळे रद्द केले होते, तर काही वधू-वर पित्यांनी चोरून लपूनच छोटेखानी सोहळ्यात आपल्या मुला-मुलींचे लग्न उरकून घेतले; परंतु आता लग्नासाठी पुरेशी मुभा असतानाही लग्नाच्या खरेदीसाठी गर्दी आढळून येत नाही.

--------------------

ऑनलाईन व्यवहारांचा परिणाम

मागील काही महिन्यांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, कापड, पादत्राणे, मोबाईल अ‍ॅसेसरीजच्या ऑनलाईन खरेदीवर बहुतेकांचा भर आहे. शेलूबाजार परिसरात कोरोना लॉकडाऊनच्या काळापूर्वीपासूनच ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला आहे. त्यात बड्या कंपन्यांनी उत्पादक ते ग्राहक अशी थेट व्यवस्था ऑनलाइनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली असून, यात ग्राहकांना बाजारपेक्षा कमी दरात विविध वस्तू मिळतात. त्यातच लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागांत अनेकांनी फिरते व्यवसाय सुरू केले आहेत. त्यात ग्राहकांना प्रत्येकच वस्तू घरपोच मिळत असल्याने बाजारपेठेत येण्यास ग्राहक उदासीन आहेत. त्याचा परिणाम बाजारपेठेतील जवळपास सर्वच व्यवसायावर झाला आहे.