शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मालाचा दर्जा चांगला नसल्याचे घेतले जाते संमती पत्र!

By admin | Updated: March 21, 2017 03:03 IST

वाशिममधील प्रकार : मोजणीला विलंब, माल पाहण्यापूर्वीच दर्जाची निश्‍चिती

वाशिम, दि. २0-शासनाने तुरीला ५ हजार ५0 रुपयांचा हमीभाव जाहीर केला. नाफेडची खरेदी सुरू केली; परंतु या दोन्ही बाबींचा शेतकर्‍यांना काहीच फायदा होत नसल्याचे चित्र वाशिम बाजार समितीत दिसत आहे. नाफेडच्या केंद्रावर शेतकर्‍यांना टोकन देऊन तब्बल दीड महिना माल मोजणीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे कंटाळल्यानंतर बाजारात माल विकणार्‍या शेतकर्‍यांकडून त्यांचा शेतमाल एफएक्यू अर्थात उच्च गुणवत्तेचा नसल्याचे प्रमाणपत्रच बाजार समितीकडून घेण्याचाही प्रताप करण्यात येत असल्याचे ह्यलोकमतह्णकडून २0 मार्च रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाला. यंदा शासनाने सोयाबीनला २ हजार ८00 रुपये, तर तुरीला ५ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला; परंतु या दोन्ही मालास हमीभाव देण्याला व्यापार्‍यांनी खो दिला आहे. मालाची प्रतवारीही चांगली आहे; परंतु शेतकर्‍याच्या मालाचे भाव पाडण्याचे कुटील षड्यंत्र बाजार व्यवस्थेकडून राबविले जात आहे. शासनाने नाफेडची खरेदी सुरू केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच वखार महामंडळाची गोदामे भरल्याने नाफेडने खरेदी संथ केली. जिल्ह्यात पाच तालुक्यांत होत असलेली नाफेडची खरेदी काही ठिकाणी महिनाभरातच साठवणुकीच्या अडचणीपोटी बंद करण्यात आली. शेतकरी आक्र मक झाल्यानंतर नाफेडने खरेदी सुरू केली; परंतु आता या ठिकाणी शेतकर्‍यांचा माल मोजण्यास तब्बल सव्वा महिन्याचा कालावधी लागत आहे. वाशिम येथे दोन वजन काटे सुरू असतानाही दिवसाला शंभर, दीडशे क्विंटल तुरीची मोजणी होत आहे. महिनाभर थांबण्याची शक्तीच शेतकर्‍यांत नसल्याने शेतकरी बाजारात व्यापार्‍यांकडे माल विकण्यावर भर देत आहेत; परंतु या ठिकाणी हमीभावाची अडचण नको म्हणून बाजार समिती चक्क प्रत्येक शेतकर्‍याकडून त्याचा माल एफएक्यू (सरासरी चांगल्या दर्जाचा) नसल्याच्या संमती पत्रावर स्वाक्षरी घेत आहे.शेतकर्‍यांकडून छुपी अडत वसुलीनाफेड आणि व्यापारी शेतकर्‍यांची लुबाडणूक करीत असतानाच अडत्याकडूनही शेतकर्‍यांना लुबाडण्याचा प्रकार वाशिम येथे सुरू असल्याचे सोमवारी उघडकीस आले. शेतकर्‍यांकडून अडत वसुली बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतरही काही शेतकर्‍यांकडून एका अडत्याने अडतीचे (बटाऊ) पैसे वसूल केल्याच्या तक्रारी बाजार समितीकडेच काही शेतकर्‍यांनी केल्या आहेत. अडत्याकडून शेतकर्‍याला देण्यात येणार्‍या पावतीवर नियमानुसार खर्चाची दर आकारणी करून पावतीच्या मागील बाजूस एक रु पया शेकडाप्रमाणे अडतीचे पैसे कापल्याचा हिशेब करून शेतकर्‍यांना पैसे चुकविण्यात आले आहेत.