फहीम आर. देशमुख / शेगाव
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली लोकोपयोगी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुर्णपणे यशस्वी झालेली असुन या योजनेमुळे राज्यभर शांती नांदत आहे. तंटामुक्तीचा हा प्रयोग आ ता शहरातही राबवायला हवा यासाठी प्रायोगीक तत्वावर आपण जिल्ह्यातील काही शहरांमध्ये राबवून गावांप्रमाणे शहरातही तंटामुक्त अभियानाचा प्रयोग करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक शामराव दिगावकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलतांना दिली. तंटामुक्त मोहीमेमध्ये बुलडाणा जिल्ह्याने मागील तीन वर्षात मोठी भरारी घेतली. बुलडाणा जिल्हा नुकताच तंटामुक्त असल्याची घोषणा शासनाने केली. २0१२-१३ या काळासाठी ७ कोटी ५९ लक्ष ७५ हजार रुपये बुलडाणा जिल्ह्यासाठी जाहीर केले असुन हा निधी लोकसंख्येनुसार पुरस्कार घोषीत झालेल्या गावांना वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ८६८ ग्रामपंचायती असुन यापैकी ५९४ ग्रामपंचाय ती शासनाने यापूर्वीच तंटामुक्त जाहीर केल्या असुन या गावांना १३ कोटी १८ लक्ष ७५ हजार रुपये यापूर्वीच सन्मानपत्रासह वाटप करण्यात आले आहे. संपुर्ण राज्यातुन सर्वात जास्त म्हणजे ७ कोटी ५९ लक्ष ७५ हजार रुपये पुरस्काराची रक्कम प्राप्त करणारा बुलडाणा जिल्हा हा एकमेव असुन हे यश पुरस्कारप्राप्त गावकर्यांचेच असल्याचे पोलिस अधिक्षक शामराव दिघावकर यांनी सांगीतले.