शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट त्वरित पूर्ण करा!

By admin | Updated: April 12, 2016 02:05 IST

किशोर तिवारी यांचे वाशिम जिल्ह्यातील बँकांना निर्देश.

वाशिम: खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकर्‍यांना पीककर्जाचे वाटप करण्यासाठी देण्यात आलेले उद्दिष्ट बँकांनी ३0 मे २0१६ पयर्ंत पूर्ण करावे, अशा सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या. पीककर्ज वाटप नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सोनाली जोगदंड, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती शिंदे, यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. संदीपान सानप, डॉ. शरद जावळे, जिल्हा अग्रणी बँक भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक एस. एस. मेहता यांच्यासह सर्व तहसीलदार, विविध शासकीय विभागांचे प्रमुख व जिल्ह्यातील सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. किशोर तिवारी म्हणाले, की सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर आणण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व बँकांनी शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेऊन पात्र शेतकर्‍यांना ३0 मे २0१६ पयर्ंत १00 टक्के पीककर्जाचे वितरण केल्यास शेतकर्‍यांना जमिनीची मशागत व पेरणीसाठी वेळेत मदत उपलब्ध होईल. पीककर्ज वितरणासाठी प्रत्येक बँकांना उद्दिष्ट निर्धारित करून दिले असून, हे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून शेतकर्‍यांना मदत करावी, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले, की सर्व बँकांनी ३0 मे २0१६ पयर्ंत शेतकर्‍यांना पीककर्जाचे १00 टक्के वितरण करावे. पीक कर्जवाटपाबाबत काही समस्या असल्यास जिल्हा प्रशासनाला कळवाव्या. त्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल.