शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ची अपूर्ण कामे विनाविलंब पूर्ण करा!

By admin | Updated: May 8, 2017 01:39 IST

जिल्हाधिका-यांचे निर्देश; मालेगाव तालुक्यातील १४ कामांना भेटी.

वाशिम : जलयुक्त शिवार अभियानातून मालेगाव तालुक्यात सुरु असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रविवार, ७ मे रोजी नऊ गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी १४ कामांची पाहणी केली. ३१ मे पूर्वी जलयुक्त शिवार अभियानाची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासोबतच कामाचा दर्जा कायम राखण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार राजेश वाजीरे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे अतिरिक्त संचालक शाह, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक बळवंत गजभिये, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, जिल्हा परिषद लघूसिंचन विभागाचे उपअभियंता बोके यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.अमानी येथे कृषी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व जिल्हा परिषद लघूसिंचन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामास जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी भेट दिली. करंजीसह पांगरी कुटे, पिंपरी येथे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुनर्भरणचर व रिचार्ज शाफ्टच्या कामांची त्यांनी पाहणी केली. यापैकी काही ठिकाणी ह्यबर्मह्ण कमी सोडण्यात आला असून तो वाढविण्याच्या व दोन पुनर्भरण चरमधील अंतर कमी करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्या.जिल्हा परिषद लघूसिंचन विभागाच्यावतीने करंजी येथे सुरु असलेल्या नाला खोलीकरण व सिमेंट नाला बांधाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. तसेच नागरतास व किन्हीराजा येथील नाला खोलीकरण, मेडशी येथील कोल्हापुरी पध्दतीचा बंधारा बांधकाम कामांनाही जिल्हाधिकार्‍यांनी भेट दिली. करंजी व किन्हीराजा येथील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. कृषी विभागाच्यावतीने वरदरी येथील नाला खोलीकरण व कळंबेश्‍वर येथे करण्यात आलेले ढाळीचे बांध व शेततळ्याच्या कामांची पाहणी केल्यानंतर ढाळीच्या बांधाच्या बाजूला चर खोदण्याच्या सूचना द्विवेदी यांनी केल्या.