शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२६ जानेवारीपर्यंत मदत वाटप पूर्ण करा

By admin | Updated: January 13, 2015 01:05 IST

विभागीय आयुक्तांच्या आढावा बैठकीत सूचना.

वाशिम : दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला. सदर मदत निधीचे वाटप २६ जानेवारी २0१५ पूर्वी पूर्ण करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ मदत निधी वाटप आढावा बैठकीत संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.१२ जानेवारी रोजी आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार, दिनकर काळे, राजेंद्र पारनाईक, तहसीलदार आशीष बिजवल, जनार्धन विधाते, श्रीकांत उंबरकर, बी.डी. अरखराव, ए. एम. कुंभार, ए. पी. पाटील उपस्थित होते.विभागीय आयुक्त राजूरकर यांनी उपस्थित अधिकार्‍यांना सूचना करताना सांगितले की, शेतकर्‍यांचे बँक खाते नंबर मिळवून मदत निधीचे पैसे तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सर्व तहसीलदारांनी प्राधान्याने करावी. प्रत्येक तालुक्याला पहिल्या टप्प्यात देण्यात आलेल्या निधीचे वाटप लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्यात.यावेळी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी जिल्ह्यात केल्या जात असलेल्या मदत निधी वाटपाची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्याला सध्या ५७ कोटी ५३ लाख रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला आहे. हा निधी मागणी केलेल्या एकूण निधीच्या ४0 टक्के इतका असून, या निधीचे सर्व तहसील कार्यालयांना वाटप करण्यात आले आहे. तहसीलला वाटप करण्यात आलेल्या निधीमध्ये वाशिम तहसील कार्यालयाला ११ कोटी, मालेगावला ९ कोटी ५0 लाख, रिसोडला १0 कोटी ५0 लाख, मंगरूळपीरला ८ कोटी ५३ लाख, मानोराला ८ कोटी व कारंजाला १0 कोटी निधी देण्यात आला आहे. तहसील स्तरावर ८0 ते ८५ टक्के शेतकर्‍यांच्या बँक खात्याचे नंबर मिळवण्यात आले असून, उर्वरित बँक खाते नंबर दोन दिवसात प्राप्त होऊन जातील. मदत वाटपातील लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत व तलाठी स्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांवर १३ जानेवारी २0१५ पर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर १४ जानेवारी २0१५ पासून मदत निधी वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. २५ जानेवारीपर्यत जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मदत निधीचे वाटप पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी यावेळी दिली.