शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक : नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:42 IST

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असला तरी मंगळवारी दिलासादायक आकडे समोर आले. नवीन बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक ...

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असला तरी मंगळवारी दिलासादायक आकडे समोर आले. नवीन बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक असल्याने जिल्हावासीयांना किंचितसा दिलासा मिळाला. मंगळवारी (दि. १८) आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४३७ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. दुसरीकडे ४६९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. सोमवारी नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती. सलग दुसऱ्या दिवशीही नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मंगळवारी ४३७ नवीन रुग्ण आाढळले तर ४६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मालेगाव, रिसोड तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. मंगळवारच्या अहवालानुसार मालेगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत, तर सर्वात कमी रुग्ण कारंजा तालुक्यात ४५ आढळून आले. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची सुविधा नसतानादेखील अनेकांना गृहविलगीकरणात ठेवण्यासाठी परवानगी दिली जात असल्याची माहिती आहे. एकाच घरात कोरोना रुग्ण आणि इतर सदस्य राहत असल्याने त्यांनाही संसर्ग होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गृहविलगीकरणाला परवानगी देताना प्रत्यक्ष पडताळणी केली तर संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. याकडे तालुकास्तरीय यंत्रणेने लक्ष द्यावे, असा सूर ग्रामीण भागातून उमटत आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्याबाहेरील २३ बाधितांची नोंद झाली आहे.

००००००००००००

४३६८ सक्रिय रुग्ण

मंगळवारच्या अहवालानुसार नव्याने ४३७ रुग्ण आढळून आले, तर ४६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ४३६८ रुग्ण सक्रिय आहेत.

000000000000

मंगळवारी आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण

वाशिम- ५८

मालेगाव- ११३

रिसोड- ८१

मंगरूळपीर- ५३

कारंजा- ४५

मानोरा- ५८

०००००००