शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘येता अन्न दारी, भरे पोट सारी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:52 IST

वाशिम : अन्न बचतीचा संदेश देत राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेने सुरू केलेल्या ‘अन्न वाचवा, जीवन वाचवा’ उपक्रमामुळे जनसामान्यांचे पोट भरत आहे व लोकांना अन्न बचतीचे महत्त्व कळत आहे. विविध समारंभात शिल्लक राहिलेले अन्न गोरगरिबांना जागेवर देण्याचा उपक्रम  या संस्थेने हाती घेतला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत केल्या जात आहे.

ठळक मुद्देउरलेले अन्न गरजूंना राजरत्न संस्थेचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अन्न बचतीचा संदेश देत राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेने सुरू केलेल्या ‘अन्न वाचवा, जीवन वाचवा’ उपक्रमामुळे जनसामान्यांचे पोट भरत आहे व लोकांना अन्न बचतीचे महत्त्व कळत आहे. विविध समारंभात शिल्लक राहिलेले अन्न गोरगरिबांना जागेवर देण्याचा उपक्रम  या संस्थेने हाती घेतला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत केल्या जात आहे.अनेक परिवार लग्नसमारंभातील शिल्लक राहिलेले अन्न या संस्थेला बोलावून देत असल्याने सर्वांना अन्न बचतीचे महत्त्व पटत असल्याचे चित्र आहे. यासाठी संस्थेचे प्रतिनिधी अन्न बचतीसह लग्नसमारंभ, पाटर्य़ा, वास्तू पूजन, विविध कार्यक्रमातील उरलेले अन्न घेऊन गजरवंत लोकांना नेऊन देत आहेत. संस्थेच्या या कामात लोकसहभाग वाढत असून, इतर जिल्हय़ातसुद्धा याविषयी जनजागृतीचे काम संस्थेने हाती घेतले आहे. जगामध्ये अन्नावाचून मृत्यूचे प्रमाण इतर सर्व मृत्यूच्या तुलनेत जास्त असून, भविष्यात अन्न वाचून राहण्याची वेळ कोणावरही येऊ नये, याकरिता वेळीच सजग होऊन अन्न बचत करण्याकरिता सर्व स्तरातून पुढाकार घेणे आवश्यक आहे. शेतीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून, वेळी-अवेळी पडणारा पाऊस यामुळे अन्नधान्याचे उत्पन्न घटत आहे. याकरिता भावी पिढीला अन्नटंचाईला सामोरे न जाण्याकरिता अन्न बचत काळाची गरज असल्याचे संस्थेचे प्रतिनिधी पटवून देत आहेत. संस्थेच्या या कार्यात विनोद पट्टेबहादूर , महादेव क्षीरसागर, अरविंद उचित, भगवान ढोले, विकास  पट्टेबहादूर, संतोष हिवराळे, अविनाश नाईक, प्रशांत राठोड, गणेश घेवारे, हंसिनी उचित, सोनल तायडे, स्नेहल तायडे, समाधान करडीले, नितीन अढाव, सुमेध तायडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. या प्रतिनिधींच्या जनजागृतीमुळे अनेकांचा लोकसहभाग या उपक्रमात वाढत आहे. 

लग्नसमारंभासह इतर समारंभात होत असलेली अन्नाची नासाडी बघता सर्व मित्र मंडळांनी बसून यावर चर्चा केली व या उपक्रमास सुरुवात केली. गत सहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुरुवातीला संस्थेचे प्रतिनिधी समारंभ ठिकाणी जाऊन विचारणा करायचे.सद्यस्थितीत अन्न शिल्लक राहिल्यास प्रतिनिधींना भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्या जातो, हे या उपक्रमाचे फलित आहे. - भगवान ढोले, प्रतिनिधी, राजरत्न संस्था, वाशिम.