शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचार्‍यांचे सामूहिक रजा आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:12 IST

वाशिम: नगर परिषद व नगर पंचायत कर्मचार्‍यांनी विविध प्रलंबित  मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील वाशिम,  कारंजा, मंगरूळपीर, रिसोड नगर परिषदेसह मालेगाव आणि मानोरा  नगर पंचायतीचे कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, मुख्याधिकारी, कंत्राटी  कर्मचारी, सफाई कामगारांनी सहभागी होत आंदोलनाचा पहिला ट प्पा म्हणून बुधवार, ९ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सामूहिक रजा  आंदोलन करण्यात आले. 

ठळक मुद्देप्रलंबित मागण्यांसाठी ‘एल्गार’चार नगर परिषद, दोन नगरपंचायतींचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: नगर परिषद व नगर पंचायत कर्मचार्‍यांनी विविध प्रलंबित  मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील वाशिम,  कारंजा, मंगरूळपीर, रिसोड नगर परिषदेसह मालेगाव आणि मानोरा  नगर पंचायतीचे कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, मुख्याधिकारी, कंत्राटी  कर्मचारी, सफाई कामगारांनी सहभागी होत आंदोलनाचा पहिला ट प्पा म्हणून बुधवार, ९ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सामूहिक रजा  आंदोलन करण्यात आले. शासनाने कर्मचारी मागण्यांच्या बाबतीत वेळकाढूपणा व उदासीनतेचे  धोरण अवलंबिले असून, इतरही अनेक चुकीच्या निर्णयांमुळे  कर्मचार्‍यांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रलंबित मागण्या पूर्ण करणे  आणि न्यायोचित हक्क मिळविण्याकरिता संबंधितांनी टप्प्याटप्प्याने  आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात  सामूहिक रजा आंदोलन होत असून, दुसर्‍या टप्प्यात १0 ते १४  ऑगस्टदरम्यान काळ्या फिती लावून काम करणे, १५ ऑगस्ट रोजी  पालकमंत्र्यांकडे मागण्यांचे निवेदन सादर करणे, २१ ऑगस्टपासून  बेमुदत कामबंद आंदोलन करीत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात  आल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उज्ज्वल देशमुख  यांनी दिली. आजच्या आंदोलनात कारंजा शाखेचे अध्यक्ष इलियास  अहमद, मुकूंद लोखंडे, रिसोड शाखेचे अध्यक्ष माणिक भागवत, प्र तापराव देशमुख, मंगरुळपीर शाखेचे अध्यक्ष राजेश खंडेतोड, दिनेश  व्यास, वाशिम शाखेचे अध्यक्ष बबनराव भांदूर्गे, नाजिम मुल्लाजी,  संजय काष्टे, मालेगाव नगर पंचायत शाखेचे अध्यक्ष गणेश भालेराव,  महादेव राऊत, सय्यद इरफान सय्यद गुलाम, तर मानोरा नगर पंचायत  शाखेचे अब्दुल वहाब तसेच वाशिमचे मुख्याधिकारी गणेश शेट्टे,  रिसोडचे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे, मंगरुळपीरचे मुख्याधिकारी  एस.एन. वाहुरवाघ, कारंजाचे मुख्याधिकारी प्रमोद वानखडे,  मालेगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी गणेश पांडे व मानोरा नगर  पंचायतचे मुख्याधिकारी माळकर, न.प. सफाई कर्मचारी संघटनेचे  जिल्हाध्यक्ष नंदू पवार, राजू मलिक, जितू बढेल, किशोर समुद्रे  यांच्यासह जिल्हय़ातील न.प.चे सर्व कर्मचारी, सफाई कामगार यांनी  सहभागी झाल्याने आंदोलन १00 टक्के यशस्वी झाल्याचा दावा  कर्मचारी संघटनेने केला आहे.