शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा कडाका वाढला; साथरोग बळावले!

By admin | Updated: January 26, 2016 02:23 IST

वातावरणातील बदलाचा परिणाम; रुग्णालयात रुग्णांची गर्दी.

वाशिम: थंडीचा कडाका आणि वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप आदी साथरोगाने डोके वर काढले असून, जिल्हय़ातील नागरिक हैराण झाले आहेत. उपचारार्थ शेकडो रुग्ण सरकारी व खासगी दवाखान्यात दाखल होत आहेत. गत चार दिवसांपासून वातावरणात अचानक गारवा आल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. २0१५ या वर्षात पावसाळ्यात फारसा पाऊस झाला नसल्यामुळे गॅस्ट्रो, डायरिया आदी आजारांची लागण झाली नाही; मात्र गत चार-पाच दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे, विषमज्वर आदी आजारांना नागरिक बळी पडत असल्याचे दिसून येते. हिमवृष्टीनंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणार्‍या शीत वार्‍याने पुन्हा एकदा जोर पकडल्याने वाशिमसह अख्खे राज्य कुडकुडले आहे. पहाटेपासूनच थंडी जाणवत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतर अधिकच थंडी वाढते. पाच दिवसांपूर्वी रात्री जिल्ह्याचे तापमान १७ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक होते. तीन दिवसांपासून तापमान १३ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले. वाढत्या थंडीमुळे जिल्हावासी वैतागले आहेत. थंडीपासून बचाव म्हणून स्वेटर, ऊबदार कपडे पुन्हा बाहेर निघाले असल्याचे दिसून येते. कडाक्याच्या थंडीमुळे वातावरणात अचानक बदल झाल्याने सर्दी, खोकला, ताप, प्लेटलेट कमी होणे आदी प्रकाराच्या आजाराने डोके वर काढले. बालके आणि वयोवृद्ध विविध प्रकारच्या आजारांना बळी पडत असल्याचे दिसून येते. विशेषत: लहान बालकांना ही थंडी अधिकच असह्य ठरत आहे. बालकांची रोगप्रतिकारक्षमता कमी असल्यामुळे सर्दी, खोकला यासारख्या आजारांचे आक्रमण लवकर होते. बालकांप्रमाणेच वृद्धांचीही हीच अवस्था आहे. उतारवयामुळे त्यांनादेखील थंडी असह्य होते. सर्दी, खोकला, डोकेदुखीसारखे आजार जडत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात साधारणत: दररोज ३00 ते ४00 नागरिक विविध आजारांच्या तपासणीसाठी येत आहेत. खासगी दवाखान्यातही रुग्णांची संख्या वाढत असल्याने दवाखाने हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येते.