शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पोलीस पोहोचण्याआधीच अवैध धंदे बंद

By admin | Updated: January 7, 2015 01:04 IST

लोकमत वृत्ताचा प्रभाव; वाशिम जिल्हय़ातील अवैध धंदे तत्काळ बंद करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे निर्देश.

वाशिम : परिसरात अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. वरली मटका, ताजी वरलीसह टेबल एक्का बादशहा, रमी, तीन पत्ते खेळल्या जात असल्याचे लोकमतने ५ जानेवारी रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आणले होते. वृत्त प्रकाशित झाल्याबरोबर घटनास्थळी पोलीस पोहोचण्याआधीच अवैध धंदे कारवाईच्या धसक्याने बंद करण्यात आलेत. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही अवैध धंदे बंद करण्यासाठी उपाय योजना आखून संबंधिताना निर्देश दिलेत.वाशिम शहर व परिसरात बेधडकपणे खुलेआम सुरु असलेल्या अवैद्य धंद्यांना पोलीस विभागाच्या वतीने लगाम लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून, ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे चालतात याची माहिती घेऊन त्या भागाची पाहणी आज करण्यात आली. काकडदाती परिसरातही पोलिसांनी आज भेट दिली असता तेथे त्यांना कोणताच अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून आले नाही. पोलीस पोहोचण्याआधीच अवैध धंदे चालविणार्‍यांनी आपले बस्तान गुंडाळले होते. या लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमुळे जिल्हय़ात सुरू असलेले छोटे-मोठे अवैध धंदेही बंद झाल्याचे चर्चेवरून दिसून आले. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला असता आपण यापूर्वीही संबंधित सर्व ठाणेदारांना अवैध धंद्यांबाबत ताकीद देण्यात आली आहे. यासंदर्भात विशेष लक्ष देऊन अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.