शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

शहर वाहतुकीची घडी विस्कटली

By admin | Updated: September 7, 2014 22:46 IST

मंगरुळपीर येथील वाहतुक व्यवस्था विस्कळीत; पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष.

मंगरुळपीर :शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कटली असून, सर्वच मुख्य चौकांत बेलगाम वाहतुकीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस प्रशासनाचे मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसते. मंगरुळपीर शहरातील रस्त्यांची रूंदी आधीच कमी असताना खासगी वाहनांच्या वर्दळीसह रस्त्याच्या दूतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. अकोला चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, वीर भगत सिंग चौक आदि दुचाकी, चार चाकी वाहनांची मोठय़ा वर्दळ असते. या चौकांत बहुतेक वाहने बेशिस्तपणे उभी करण्यात आलेली दिसतात. अकोला चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक आदि ठिकाणी खासगी प्रवासी वाहने रस् त्यावरच उभी करण्यात येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन इतर वाहनांसह पादचार्‍यांनीही मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागतो. खासगी प्रवासी वाहनांच्या बेशिस्तीमुळे अनेकदा किरकोळ अपघाताच्या घटना घडून वादही उद्भवले आहेत. या प्रकाराला आळा घालण्यात आला नाही, तर एखाद वेळी येथे मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नागरिकांकडून अनेकदा निवेदनही देण्यात आले आणि त्यावर कारवाईही करण्यात आली; परंतु थोड्याच दिवसांत परिस्थिती ह्यजैसे थेह्ण झाली. त्यामुळे पोलिस प्रशासनाचा जनतेवर मुळीच वचक नसल्याचे दिसत आहे. अकोला चौक हा शहरातील मुख्य चौक असून, या ठिकाणी प्रवासी निवाराही आहे. या प्रवासी निवार्‍याचा वापर इतर बाबींसाठी अधिक होत असला तरी, अकोला, कारंजाश्, वाशिम, मानोरा आदि ठिकाणी जाणार्‍या येणार्‍या बसेस येथे थांबतात. त्यामुळे येथे सतत मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. या ठिकाणच्या वाहतुकीवर पोलिसांचे मुळीच नियंत्रण नाही. चौकात सर्वत्र चार चाकी, दूचाकीेंसह ऑटोरिक्षा बेतालपणे उभ्या केल्या जातात. त्यामुळे बसमधून चढण्या उतरण्यासाठी प्रवाशांना धड जागाही राहत नाही. याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येते. मुख्य चौकांमधील बेलगाम वाहतुकीवर नियंत्रण मिळविले नाही, तर एखाद वेळी मोठी घटना घडेल आणि त्यासाठी प्रशासनच जबाबदार असेल. त्यामुळे यावर त्वरीत उपाय योजना कराव्या, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.