शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मटन मार्केटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: May 12, 2014 23:22 IST

परिसरात सतत अस्वच्छता व घाण

वाशिम : स्थानिक रविवार बाजार स्थित नगर परिषद शॉपींग कॉम्पलेक्स लगतच असलेल्या मटन मार्केट परिसरात सतत अस्वच्छता व घाण राहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर मटन मार्केट गावाबाहेर हलविण्यात यावे अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. वाशिम हे जिल्हयाचे मुख्यालय असून शहराच्या मधोमध रविवार बाजार येथे नगर पालीकेच्या व्यापारी संकुलला लागूनच मटन मार्केट बांधण्यात आले आहे सदर मटन मार्केट मध्यवस्तीत असून या परिसरात सतत घाणीचे साम्राज्य राहते त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. सदर मटन मार्केटमध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याला लागूनच येथे मोठी विहीर असून या विहीरीतून नालसाहेबा पुरा, शिवाजी मार्ग, पाटणी चौक, या परिसरात नागरिकांना पिण्याच्या पुरवठाहोत असतो सदर विहीरींमध्ये मटन मार्केट मधील मांस तुकडे व इतर घाण टाकली जात असल्यामुळे याचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या मटन मार्केटच्या घाणीमुळे व दुर्गंधी मुळे शॉपींग कॉम्पलेक्स मधील दुकानदारासह येथे येणारे ग्राहक व अवागमन करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सदरचे मटन मार्केट शहराच्या मध्यभागातून हलवून अन्यत्र गावाबाहेर स्थलांतरीत करावे अशी नागरिक मागणी करीत आहे.