कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०१९-२०चे शैक्षणिक सत्र अर्ध्यावर थांबविण्यात आले. २०२०-२१ चे सत्र सुरूच झाले नाही. २०२१-२२ मध्येही ही परिस्थिती कायम असून शाळा सुरू होण्यासंबंधी कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे बहुतांश शाळांनी गतवर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन शिक्षण देणे सुरू केले आहे; मात्र बहुतांश मुलांचा सुटी मूड अद्यापही कायम असून त्यांचे ऑनलाइन क्लासेसमध्ये मन रमत नसल्याने पालकांची डोकेदुखी वाढलेली आहे.
....................
पालकांनी घरातच घ्यावी शाळा...
कोरोनाचे संकट निवळले; मात्र पूर्णत: संपलेले नाही. त्यामुळे आताच मुलांना शाळेत पाठविणे योग्य ठरणार नसल्याचा सूर उमटत आहे.
पालकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पाल्यांना घरातच ठेवून आपापल्या परीने होईल तेवढे शिक्षण द्यावे, असे बोलले जात आहे.
.................
पालकांची अडचण वेगळीच
गेल्या १५ महिन्यांपासून मुले घरातच आहेत. कोरोनामुळे शाळा नाही आणि कुठे बाहेरही फिरायला मिळत नसल्याने त्यांच्यात चिडचिडेपणा आला आहे. यामुळे पालकांची डोकेदुखी वाढलेली आहे.
- जनार्दन बोरकर
.......................
पुर्वी मुलांच्या हातात मोबाइल दिसला की त्यांच्यावर रागवावे लागत असे; मात्र ऑनलाइन शिक्षणामुळे नाईलाजास्तव आता स्वत:लाच त्यांच्या हातात मोबाइल द्यावा लागत आहे.
- एकनाथ कावरखे
..................
अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळांकडून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यासह मुलांना होमवर्कही दिला जात आहे.
बहुतांश विद्यार्थी मात्र ऑनलाइन क्लासेसला कसेबसे बसत असले तरी होमवर्क करायला कंटाळा करीत आहेत.
मोबाइलवर राहून डोके दुखते, सारखे बसून पोट दुखत आहे, नेट कनेक्टिव्हिटी नसल्याने टिचरचे शिकविणे समजतच नाही, क्लास सुरू असतानाच भूक लागली, अशी अनेक कारणे मुलांकडून पुढे केली जात आहेत.
ऑनलाइन क्लास संपल्यानंतर अनेक मुले होमवर्क पूर्ण करीत नाहीत. शिकविलेले समजलेच नाही तर होमवर्क कसे करणार, हा त्यांचा प्रश्न असतो.
.......................
ग्राफ
पहिलीचे विद्यार्थी - १९६९०
दुसरीचे विद्यार्थी - २०९९८
तिसरीचे विद्यार्थी - १९६९८
चौथीचे विद्यार्थी - २११७७