शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दूध शीतकरण केंद्र बनले ‘विश्रामगृह’

By admin | Updated: September 9, 2015 01:52 IST

‘लोकमत स्टिंग ऑपरेशन’मध्ये आढळले दूध शीतकरण केंद्राचे बहुतांश कर्मचारी गैरहजर.

वाशिम : काटा रोडस्थित येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राचा वापर सद्या चक्क 'विश्रामगृह' म्हणून केला जात असल्याची गंभीर बाब लोकमतने मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन'दरम्यान उघड झाली. इनमिन सहा कर्मचारी कार्यरत असलेल्या या केंद्रात मंगळवारी केवळ केंद्रप्रमुख वाय.एस.चौधरी हे आढळून आले. ते देखील अकोला-वाशिम 'अपडाऊन'ने थकल्यामुळे केंद्राच्या कार्यालयात झोपलेले होते. पूर्वी वाशिम जिल्ह्यात वाशिम आणि कारंजा असे दोन शीतकरण केंद्र कार्यान्वित होते; मात्र गत चार वर्षांंपूर्वी कारंजाचे केंद्र बंद पडले. वाशिममध्ये सुरु असलेले शीतकरण केंद्रदेखील सध्या नावालाच उरले आहे. काटा रोडवर अगदी मोक्याच्या ठिकाणी शासकीय दूध शीतकरण केंद्राची सहा एकर जागा आहे. त्यात एका ठिकाणी असलेल्या इमारतीत दूध थंड केले जाते. इमारतीची आतून पाहणी केली असता, सर्वत्र घाण आणि कचरा साचलेला दिसून आला. दूध थंड करण्याचे दोन मोठे यंत्र गेल्या १५ ते १७ वर्षांंपासून नादुरुस्त असल्यामुळे सद्या त्याचा वापर पाणी ठेवण्यासाठी केला जात असल्याचे पाहावयास मिळाले. या केंद्रात चतुर्थ श्रेणीचे पाच कर्मचारी कार्यरत असताना स्वच्छतेकडे गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष पुरविल्या गेले नाही. यामुळेच इमारतीच्या आतील भागात ठिकठिकाणी जाळे पसरल्याचे आढळून आले. केंद्रात कार्यरत केंद्रप्रमुख चौधरी यांच्यासह चतुर्थ श्रेणीचे चार कर्मचारी दैनंदिन अकोला-वाशिम 'अपडाऊन' करतात. मंगळवारी मात्र सर्वच चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांनी कार्यालयीन कामकाजास चक्क 'दांडी' मारुन घरीच आराम करणे पसंद केल्याची माहिती मिळाली. सध्या वाशिमच्या दूध शीतकरण केंद्रात जिल्ह्यातील मालेगाव, शिरपूर, रिसोड, मंगरुळपीर, जांभरुण नावजी, कळंबा महाली, फाळेगाव थेट, वाळकी आदी गावांमधून दररोज १000 लीटर दूध येत आहे; मात्र अकोला येथे एवढे दूध पाठवित असताना 'ट्रान्सपोर्ट'चा खर्च परवडणारा नसल्याने दोन दिवसाचे संकलित झालेले दूध पाठविण्यात येत असल्याची बाबदेखील 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये निदर्शनास आली.