शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

By admin | Updated: August 15, 2014 02:08 IST

वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्तारोको आंदोलन

वाशिम : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीकरिता समाजबांधवांच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी वाशिम शहरासह जिल्हाभरात चक्का जाम, रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. रास्ता रोकोमुळे काही वेळेसाठी वाहतुक ठप्प झाली होती.वाशिम : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी वाशिम येथील पुसद नाका चौकात सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये स्थान मिळत नसल्याने समाजबांधवांवर अन्याय होत आहे. समाजाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनामुळे काही वेळेसाठी पुसद, अमरावती, हिंगोली मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती किसनराव मस्के, बाळू मुरकुटे यांच्यासह समाजबांधवांची बहुसंख्येने उपस्थिती होती.कारंजालाड : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीकरिता समाजाच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता स्थानिक भिलखेडा जवळील द्रूतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.धनगर जातीच्या समावेशासाठी भारतीय राज्यघटनेतील अनुसूचिमधील ३६ व्या क्रमांकावर नमुद असलेल्या बाबींची त्वरित अंमलबजावणी करून धनगर समाजाला न्याय द्यावा या पार्श्‍वभूमिवर धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सपूंर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कारंजा तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी कारंजा भिलखेडा हायवेवरील चौफुलीवर रास्ता रोको केल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. या प्रसंगी सर्वांनी स्वत:हून अटक करवून घेतली. ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अढावू यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस स्टेशनमधून सर्वांची सुटका करण्यात आली. मंगरुळपीर : धनगर समाजाचा अनुसुचीत जमातीत समावेश करावा या मागणीसाठी १४ ऑगस्ट रोजी सकाळी १0.५0 वाजता शेलूबाजार चौकातील औरंगाबाद ते नागपुर दृतगती मार्गावर परिसरातील धनगर समाज बांधवांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान मंगरूळपीर पोलीसांनी २0 कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडुन दिले. या दरम्यान सकाळपासुनच पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी राज्यभर धनगर समाजाचे वतीने आंदोलन सुरू आहे. तालुक्यात शेलूबाजार परिसरात बहुसंख्य धनगर समाज असल्याने औरंगाबाद ते नागपुर दृतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी जवळपास २00 ते २५0 समाजबांधव जमले होते. या दरम्यान सकाळ पासुनच बंदोबस्ताला आलेल्या मंगरूळपीर पोलीसांनी २0 कार्यकर्त्याना कलम ६८ अंर्तगत अटक करून सुटका केली. सुसाट वेगाने धावणार्‍या दृतगती मार्गावरील वाहतुक काही वेळेसाठी थांबली होती. पोलीसांनी अनुचीत प्रकार घडु नये म्हणुन गावाबाहेरच हायवेची वाहतुक थांबवुन ठेवली होती. त्यामुळे कोणत्याच प्रकारची अनुचीत घटना घडली नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पडले.