शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या धोरणामुळे तरुणात चैतन्य

By admin | Updated: September 7, 2014 03:00 IST

वाशिम विधानसभा मतदारसंघ : इच्छुकांची संख्या वाढली.

वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भाजपने चाणक्य नामक संस्थेमार्फत केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवालात विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघांपैकी अनुसूचित जा तीसाठी ९ तर अनुसूचित जमातीसाठी ७ मतदारसंघ राखीव आहेत. या मतदारसंघांमध्ये नवीन चेहर्‍याला संधी देण्याची रणनीती भाजपाचे धोरण असल्याच्ी माहिती इच्छुक उमेदवारांना झाल्याने वाशिम विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नवीन चेहर्‍यांवर हास्य फुलले असून, सकाळपासूनच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन ह्यआता जमतेचह्ण कामाला लागण्याचा सल्ला नवीन इच्छुक उमेदवाराकडून दिल्या जात आहे. वाशिम विधानसभा मतदार संघात भाजपाच्या इच्छुक उमेदवाराची मोठी यादी असली तरी ७ जण आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता जोरदार फिल्डिंग लावताना दिसून येत आहेत. यामध्ये काही लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. तसेच ५ नवीन चेहरे असून, या सर्वांना आ ता आपलेच जमते, असे वाटत आहे. सर्वांनी पुन्हा जोमाने कामास सुरुवात केली असून, म तदारांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत. काही दिवसांआधी वाशिम विधानसभा मतदारसंघातील एका इच्छुक उमेदवाराने मोठय़ा प्रमाणात फिल्डिंग लावली होती; मात्र त्यांचे नावच कुठेही नसल्याने विविध चर्चांना रंगत येत आहे. काही दिवसांआधी भाजपामध्ये आरोप -प्रत्यारो पाच्या राजकारणासही सुरुवात झाली होती; मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब होत असल्याने सर्वत्र शांतता पसरली असतानाच मधातच चाणक्य नामक संस्थेच्या अहवालाची चर्चा भाजप वतरुळात पसरली व पुन्हा या पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षात इमाने इतबारे काम करणारे पण विधानसभा लढविणारे काही नवीन चेहरे या अहवालामुळे अतिशय आनंदित झाले असून, त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. चाणक्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात काही विद्यमान आमदारांनाही डच्चू देण्याची शिफारस करण्यात आली असल्याच्या माहितीने वाशिम विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या चर्चेने राजकीय वतरुळासह जनतेत विविध विषयांवर गप्पा होताना दिसून येत आहेत.