वाशिम : विधानसभा निवडणूकीसाठी विविध राज्यातून आणण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या के द्रनिहाय वितरणाचा पहिला टप्पा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. केद्रनिहाय वितरणासाठी आवश्यक असलेली रॅण्डमायझेशनची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर म तदानयंत्रांचे मतदारसंघ निहाय वितरण करण्यात आले. प्रत्येक मतदारसंघातील मतदान केंद्राच्या सं ख्येपेक्षा दहा टक्के जादा मतदान यंत्रे संबंधित मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे देण्यात येणार आहेत. त्यानुसार रिसोड मतदार संघासाठी ३४0 , वाशिम मतदारसंघासाठी ३७३ , कारंजा मतदारसंघासाठी३४९ मतदानयंत्रे देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
मतदान यंत्रांचे केंद्रनिहाय वितरण
By admin | Updated: September 21, 2014 22:41 IST