मानोरा (वाशिम) : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या पंचाळा फाटा ते पोहरादेवी या रस्त्यावरील एका नाल्याजवळ इंडिका कंपनीची कार जळालेल्या स्थितीत आढळून आल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान इंडिका व्हिस्टा क्रमांक एमएच २९ एडी-६३८२ ही कार पंचाळा ते पोहरादेवी रस्त्यावरील नाल्याजवळ बेवारस जळालेल्या स्थितीत एका इसमास दिसून आली. त्याने दूरध्वनीवरून याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले व कारच्या नंबरवरून यवतमाळ येथील परिवहन विभागशी संपर्क साधला. सदर गाडी दिग्रस येथील मोहम्मद सोहेल, मोहम्मद इस्माईल यांची असल्याची माहिती मिळाली. त्यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला गाडी चोरी गेल्याची तक्रार नोंदविलेली होती, हे विशेष.
जळालेल्या अवस्थेत आढळली कार
By admin | Updated: December 28, 2014 01:25 IST