शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

परंपरागत चिन्हांनाच उमेदवारांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:10 IST

जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, ...

जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरूळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ४ जानेवारी राेजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कारंजा ९५, मानाेरा १३१, रिसाेड २३३, वाशिम १९९, मालेगाव २२० आणि मंगरूळपीर येथील १५२ उमेदवारांनी माघार घेतली. सहा तालुक्यांतील १,०३० उमेदवारांनी माघार घेतल्याने १,४८७ जागांसाठी ३,२२६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. निवडणूक आयोगाने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ४० चिन्हांची वाढ केलेली आहे. त्यात भाजीपाला, मोबाइलचे चार्जर, संगणकाचे माउस अशाही काही चिन्हांचा समावेश आहे. पूर्वीच्या १५० चिन्हांऐवजी १९० निवडणूक चिन्हे आयाेगाने केली असली तरी उमेदवारांनी परंपरागत चिन्हांनाच पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

....................

दैनंदिन वापरातील चिन्हे

हेल्मेट, नेलकटर, मिक्सर, माइक, दुर्बीण, कढई, ब्रेड टोस्टर, उशी, फ्रीज, स्टॅपलर, सेफ्टी पीन अशा घरगुती व स्वयंपाकघरातील वापराच्या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

सोबतच भेंडी, मका, वाटाणे, फुलकोबी, ढोबळी मिरची, आलं (अद्रक), हिरवी मिरची, अननस, कलिंगड, द्राक्षे, पेरू, नारळ अशा काही चिन्हांचाही समावेश करण्यात आला.

............

प्रतिबंधात्मक आदेश लागू

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. तसेच १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रांवर १४ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून ते १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाने निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांवर १८ जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.