शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कंपनीमधील स्वेच्छानवृत्ती योजना रद्द

By admin | Updated: August 23, 2014 02:10 IST

वाशिम जिल्ह्यातील महावितरणच्या कामगारांमध्ये अस्वस्थता: ऊर्जा मंत्र्यांकडे लक्ष देण्याची मागणी.

वाशिम :महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून कर्मचार्‍यांच्या वयाच्या ४५ वर्षांनंतर, तसेच सेवा संपण्यास किमान दोन वर्षे कालावधी उरला असताना स्वेच्छानवृत्ती घेण्याची मुभा देणारी योजना अचानकपणे रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कंपनीतील कामगारांत खळबळ उडाली असून, याप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ३१ जुलै २0१४ रोजी परिपत्रक क्रमांक ४९४ नुसार ४५ वर्षे वय पूर्ण झालेल्या, तसेच दोन वर्षे सेवा शिल्लक असलेल्या वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्‍यांसाठी स्वेच्छानवृत्ती योजना लागू केली. कंपनीचे अध्यक्ष, तसेच व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील ठरावाला मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील सर्व झोनमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले; परंतु कंपनीच्या २0 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीत ऐन वेळी मांडलेल्या विषयामध्ये ही बहुचर्चित योजना क ोणतेही ठोस कारण न देता परिपत्रक क्रमांक २६१४८ काढून रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे वीज वितरण कंपनीतील कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्र्यांनी हस्तक्षेप करून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना का रद्द करण्यात आली. यासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने १९ ऑगस्ट रोजी कंपनीचे अध्यक्ष, तसेच व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांची भेट घेऊन स्वेच्छानवृत्ती योजनेतील त्रुटींसदर्भात चर्चा केली असता. त्यामध्ये त्रुटी असल्याचे मान्य करीत योजनेचे परिपत्रक तूर्त स्थगित करणार असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु ही योजनाच रद्द करून कंपनीने कामगारांच्या भावनांशी खेळ केल्यामुळे येत्या ११ सप्टेंबर रोजी अकोला येथे संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करून पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार आहे.