शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहनांमुळे हादरतोय काटेपूर्णा नदीवरील पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

मालेगाव : तालुक्यातील जऊळका रेल्वे गेट क्रमांक १०२ औरंगाबाद-नागपूर सुपर हायवेवरील काटेपूर्णा नदीवर असलेला पूल अपघातास निमंत्रण देणारा ठरत ...

मालेगाव : तालुक्यातील जऊळका रेल्वे गेट क्रमांक १०२ औरंगाबाद-नागपूर सुपर हायवेवरील काटेपूर्णा नदीवर असलेला पूल अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. पुलाची दयनीय अवस्था झाली असून जड वाहने धावत असताना पूल हादरत असल्याचा अनुभव अनेकजण बोलून दाखवत आहेत. पुलावर खड्डेच खड्डे पडले असून १४ जुलै रोजी वाशिमहून जऊळका येथे वाहनाने जात असलेला रेल्वे कर्मचारी खड्ड्यामुळे पडून जखमी झाल्याची घटना घडली. काटेपूर्णा नदीवरील याच पुलावरून काही महिन्यांपूर्वी ट्रक पाण्यात पडला होता. लहान मुलगाही पाण्यात पडला होता. त्याचा मृतदेह चार ते पाच दिवस सापडला नव्हता. काटेपूर्णा नदीवर लघुसिंचन विभागाच्या अखत्यारित येणारा चाका सिंचन प्रकल्प आहे. पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता असून त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळीही वाढ होणार आहे. या पुलाचे काम करण्याची आवश्यकता असून हा पूल रस्ते विकास महामंडळाकडे असूनसुद्धा हे काम लघुसिंचन विभाग करेल, असा वाद आहे. तथापि, प्रशासनाने हा प्रश्न सामोपचाराने निकाली काढून पुलाची व पुलावरील रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

......................

१९८४ मध्ये वाहून गेला होता

पूल जऊळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीवरील पूल यापूर्वी १९८४ मध्ये पुराच्या पाण्याने वाहून गेला होता. त्यानंतर नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली. त्याला आजमितीस ३७ वर्षे होत आहेत. सध्या पुलाची दयनीय अवस्था झाली असून पुलावरील रस्ताही नादुरूस्त झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होण्यासोबतच अपघातांची शक्यताही बळावली आहे.

140721\2936screenshot_2021-07-14-17-19-25-003_com.whatsapp.jpg

पडलेलं वाहन