शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही आरोपींना अटक

By admin | Updated: September 2, 2015 02:22 IST

महागाव येथील प्राणघातक हल्लाप्रकरण.

रिसोड (जि. वाशिम): पूर्ववैमनस्यातून डव्हळे कुटुंबातील दोन सदस्यांनी जमधाडे कुटुंबातील चार जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना तालुक्यातील महागाव येथे ३१ ऑगस्टच्या पहाटे ३.३0 वाजताच्या सुमारास घडली होती. या घटनेतील डव्हळे कुटुंबातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात रिसोड पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास यश आले. रिसोडनजीकच्या मेहकर रोड परिसरातून आरोपींना पकडण्यात आले. दरम्यान, या घटनेतील तिघांची प्रकृती दुसर्‍या दिवशीही चिंताजनक असून, त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. महागाव येथील स्वस्त दुकानदार संजय तुकाराम डव्हळे यांचे देवानंद जमधाडे व प्रतिक जमधाडे यांचे सोबत रेशनच्या माल वाटपावरुन वाद झाला होता. दोघांचेही घर एकमेकांचे घरासमोर आहेत. त्यातच एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून डव्हळे व जमधाडे कुटुंबात धूसफुस सुरू होती. यामधून संजय डव्हळे व गजानन डव्हळे यांनी ३१ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास देवानंद जमधाडे यांचे घरात घुसून देवानंद व पुनम देवानंद जमधाडे, पुनमची आई छायाबाई यांना जबर मारहाण केली. ही घटना घडत असताना शेजारी राहणारे सिद्धार्थ मनोहर जमधाडे व त्याची आजी वच्छलाबाई यांनी आरडाओरड करीत देवानंदचे घरी गाठले. वच्छलाबाईने अडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिलाही कोयत्याने मारले. यामध्ये वच्छलाबाईच्या हाताची बोटे तुटून पडली. संजय व गजानन डव्हळे या दोन आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून सदर दोन्ही आरोपी फरार होते. घटनेच्या काही कालावधीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवित घटनेत प्रत्यक्ष सहभागी असलेले मुख्य दोन आरोपींना अटक केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन विशेष पथकाने दोन्ही आरोपींना मेहकर फाट्यावरुन ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी संग्राम सांगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.ए. रउफ, पोलीस उपनिरीक्षक रवि हुंडेकर पोलीस कर्मचारी संजय क्षीरसागर, राजेश गिरी, गजानन पांचाळ, विनोद घनवट यांनी कामगिरी बजावली.