शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पावतीआड रेतीची अवैध वाहतूक

By admin | Updated: January 28, 2016 23:38 IST

१७ पैकी तीन रेतीघाटांचा लिलाव; गौण खनिज चोरीचे मराठवाडा कनेक्शन उघड.

संतोष वानखडे /वाशिम: बोगस किंवा बनावट पावतीच्या नावाखाली मराठवाड्यातून वाशिम जिल्ह्यात गौण खनिजाची सर्रास अवैध वाहतूक सुरू असल्याचे समोर येत आहे. एका महिन्यापूर्वी वाशिम तहसीलच्या पथकाने जप्त केलेली सेनगाव तहसीलची पावती बनावट असल्याचे समोर आल्याने, रेती चोरीचा गोरखधंदा उजागर झाला. २0१५ या वर्षात जिल्ह्यावर वरुणराजा रूसला. अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने बाजारपेठेत फारशी उलाढाल नाही. बांधकाम क्षेत्रालादेखील कोरड्या दुष्काळाची झळ बसली. यामुळे रेतीघाटांचे लिलावही पूर्ण होऊ शकले नाहीत. जिल्ह्यात एकूण १३२ रेतीघाट असल्याची नोंद गौण खनिज विभागाच्या दप्तरी आहे. गत दोन वर्षांपासून रेती घाटांचा लिलाव करण्याच्या पद्धतीत बदल झाल्याने २0१५ मध्ये पर्यावरण विभागाची मंजुरी मिळालेल्या रेतीघाटांची संख्या २७ वर आली. यावर्षी रिसोड, वाशिम, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा व मानोरा तहसीलदारांनी तालुक्यातील रेतीघाटांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. या अहवालानुसार जिल्हा प्रशासनाने मंजुरीसाठी सदर प्रस्ताव भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे सादर केले. मात्र, यापैकी रेतीचा उपसा करण्यासाठी १७ प्रस्ताव योग्य असल्याचा अहवाल पर्यावरण विभागाने दिल्याने १७ घाटांचे लिलाव होणार आहे. यापैकी तीन लिलाव झाले असून उर्वरीत लिलाव कार्यवाहीत असल्याचे सांगण्यात येते. नागरिकांची रेतीची गरज भागविण्यासाठी अनेकांनी रेती तस्करीची ह्यदुकानदारीेह्ण सुरू केल्याची माहिती आहे. मराठवाड्यातून रिसोड किंवा वाशिम तालुक्यात रेतीची सर्रास वाहतूक होत आहे. वाशिम तहसीलने मराठवाड्यातून येणार्‍या वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवून दंडात्मक कारवाया केल्या. एका महिन्यापूर्वी एका वाहतुकदाराने सेनगाव तहसीलची पावती दाखविली. मात्र, सदर पावतीबाबत शंका उपस्थित झाल्याने पडताळणीसाठी जिल्हा गौण खनिज कार्यालयाकडे सादर केली. त्यानंतर सदर पावती सेनगाव तहसीलदाराची नसल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित वाहतुकदाराकडून दंड वसूल केला. पावती बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे का टाळले? हा प्रश्न खूप काही सांगून जात आहे. अशा बोगस पावतीच्या पदराआड सेनगाव तालुक्यातून रिसोड तालुक्यात गिट्टी, रेती आदी गौण खनिजाची सर्रास वाहतूक केली असल्याचे चित्र आहे.