.............
२८ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी १४ ऑगस्टपासून २८ ऑगस्टपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१)(३) नुसार जिल्हादंडाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
....................
शेतकऱ्याचा स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा
वाशिम : जमिनीची खोटी खरेदी करून खोटे अहवाल दिल्याप्रकरणी दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखडे यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे काही दिवसांपूर्वी निवेदन सादर केले होते.
...................
दुकाने वेळेत बंद करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार ते शुक्रवार या कालावधीत रात्री आठ वाजेपर्यंत; तर शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आणि रविवारी दिवसभर बंदचा आदेश प्रशासनाने दिला. दरम्यान, हा नियम प्रत्येकाने पाळावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.