शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

काळविटाची शिकार

By admin | Updated: September 7, 2015 01:41 IST

कारंजा तालुक्यातील मांडवा येथे काळविटाची शिकार;अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

कारंजा लाड (जि. वाशिम) : कारंजा तालुक्यातील मांडवा येथे काळविटाची शिकार झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी वन विभागाने अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आता दोन संशयित आरोपीची चौकशी कारंजा वन विभागाकडून सुरू आहे. या काळविट शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी कोण हे दोघांच्या चौकशीनंतर निश्‍चित होईल.४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये निनावी फोन आला की, कारंजा तालुक्यातील मांडवा येथे कोण्या अज्ञात व्यक्तीने काळविटाची शिकार केली आहे, त्या माहितीच्या आधारावर कारंजा वन परीक्षेत्र विभागाचे क्षेत्रीय सहायक संजय नांदुरकर, ए.बी. इढोळे, राठोड, ए.पी. पवार, इंगळे यांनी ४ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजताच्या दरम्यान मांडवा गावात प्रवेश केला. पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीवरुन सुनील पांडुरंग पवार यांचे घर गाठले. यावेळी घराची तपासणी केली असती घरामध्ये काळविटाची शिकार झाल्याचे काहीच आढळून आले नाही; मात्र यावेळी वन कर्मचार्‍यांनी गावात पाहणी केली असता सुनील पवार यांच्या घराच्या उत्तरेस काळविटाचे जाळलेले अवशेष आढळून आले. त्यावेळी वनविभागाने पंचनामा करून त्या काळविटाचे अवशेष जप्त केले. त्याच वेळी रात्री ८ वाजता वनपरीक्षेत्र विभाग कारंजा येथे सुनील पवार व जीवन पवार यांना चौकशीकरिता बोलावले असता त्या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही. शेवटी या संशयितांना समज देऊन दोघांना पुन्हा ७ सप्टेंबर रोजी बोलावण्यात आले आहे. त्यावरुन काळविट शिकार प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण १९७२ चे कलम ३९, ९,३९,४८ (अ), ४९, ५१ मधील तरतुद नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीतून बरेच काही समोर येणार आहे. ४ सप्टेंबरला सदर घटना उघडकीस आली असून, अद्याप या घटनेतील रहस्य उलगडले नाही, यावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत.