खासदार भावना गवळी व आमदार पाटणी यांच्यात झालेल्या वादाचे पडसाद कारंजात उमटले असून, भाजपा कार्यकर्त्यांनी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रॅली काढली. यावेळी काही वेळ प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली हाेती.
भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ. राजीव काळे व विजय काळे, शहर अध्यक्ष ललित चाडक यांच्या नेतृत्वात कारंजा मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांना खासदार गवळी यांनी केलेली दमदाटी निंदनीय असून, या घटनेचा निषेध कारंजा भाजपाकडून शहरात रॅली काढून करण्यात आला. यावेळी भाजपाचे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपा कार्यकर्ते यांनी खा. गवळी विरोधात घोषणाबाजी करून त्यांचे पाेस्टर जाळण्यात आले.
भाजपाकडून काढण्यात आलेली रॅली विनापरवानगी
भाजपाकडून काेणत्याच प्रकारची परवानगी न घेता रॅली काढण्यात आली. या रॅलीला पाेलिसांनी सुद्धा बंदोबस्त दिला. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख गणेश बाबरे यांनी पोलिसांकडे केली आहे.