शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

‘बिट मार्शल’चा पहारा थांबला!

By admin | Updated: May 31, 2017 01:03 IST

केवळ तीन बिट मार्शल होते स्थापित : पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता

नंदकिशोर नारे। लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ३८ मोहोल्ल्यातील कोट्यवधीची संपत्ती व सराईत गुन्हेगारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी केवळ तीन ‘बिट मार्शल’ सोपविली होती. गत काही दिवसांपासून या बिट मार्शलमध्ये असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पहारा थांबविला आहे. नेमका या संधीचा फायदा उचलून चोरटे आपले काम फत्ते करण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकमतच्यावतीने ३० मे रोजी बिट मार्शलमधील कर्मचाऱ्यांनी भेट दिल्यानंतर काही ठिकाणी वह्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यावर भेटी दरम्यान शेरा लिहून सही करण्याचे प्रयोजन आहे. त्या वह्यांची पाहणी केली असता, २३ एप्रिलनंतर कोणत्याच अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी भेट दिली नसल्याचे आढळून आले.वाशिम शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक सुधीर हिरेमठ यांच्या कार्यकाळात चोरीच्या घटना व इतर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सात बिट मार्शल दिवस पाळीत व सात बिट मार्शल रात्र पाळीमध्ये गस्तीवर असायचे. हिरेमठ यांची बदली झाल्यानंतर हळूहळू ‘बिट मार्शल’ची संख्या कमी करून ती आजमितीला केवळ तीनवर आणण्यात आली आहे. यामुळे साहजीकच बिट मार्शलच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढली. एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रावर नजर ठेवून गुन्हेगारावर लक्ष केंद्रित करणे बिट मार्शलसाठी चांगलेच जिकरीचे ठरत असताना काही दिवसांपासून हे कार्यच बंद झालेले दिसून येत आहे. या कार्यातही अनियमितता असल्याचे भेटीवर करण्यात आलेल्या शेऱ्यावरून दिसून येत आहे.रात्रीच्यावेळी कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार व चोऱ्यांच्या घटनेवर अंकुश ठेवण्यासाठी ‘बिट मार्शलच्या’ संख्येत वाढ करणे आवश्यक असतानासुद्धा आहेत. त्याच बिट मार्शलमधील अधिकारी, कर्मचारी ठरवून दिलेल्या भागात जात नसल्याचे दिसून आले आहे. बिट मार्शलच्या जबाबदारीची अशीच परिस्थिती असेल तर गुन्हेगारीच्या आलेखामध्ये निश्चितच वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस विभागात ‘मॅन पॉवर’ कमी असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलल्या जाते. बिट मार्शल म्हणजे काय?पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कार्यक्षेत्रामधील सराईत गुन्हेगार, भुरटे चोर, संशयीत व्यक्ती यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांवर जबाबदारी दिल्या जाते. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना परिसरामध्ये सातत्याने गस्त घालावी लागते. ही जबाबदारी पार पाडणाऱ्याला ‘बिट मार्शल’ असे संबोधतात. वाशिम शहरात आधी सात व नंतर तीन बिट मार्शल कार्यरत असून, त्यांच्याकडून शहरात गस्त केल्या जाते; परंतु अनेक दिवसांपासून या गस्तकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. शहरातील रात्रीच्या चोऱ्या टाळण्यासाठी याकडे पोलीस विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.नव्यानेच प्रशासकीय व विनंतीवरुन बदल्या आम्ही केल्या आहेत. सर्वच पोलीस स्टेशनला जास्तीत जास्त मनुष्यबळ देण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयावर चर्चासुद्धा झाली असून, लवकरच बिट मार्शल पूर्ववत केल्या जाणार आहे. मनुष्यबळाअभावी केवळ ते थांबले होत, यावर विचार झाला असून, लवकरच यावर तोडगा काढण्यात येणार आहे.-मोक्षदा पाटीलजिल्हा पोलीस अधीक्षक , वाशिम