शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

भरारी पथकांची कृषी सेवा केंद्रांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून ढगाळी वातावरण कायम राहत आहे. पावसाळ्याला वेळेतच सुरुवात होईल, असे गृहीत ...

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून ढगाळी वातावरण कायम राहत आहे. पावसाळ्याला वेळेतच सुरुवात होईल, असे गृहीत धरून शेतकऱ्यांनी रासायनिक खते व बियाणे खरेदी करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, या वर्षी युरिया वगळता इतर सर्व रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली होती; मात्र केंद्र शासनाने खतावरचे अनुदान वाढविल्याने विविध कंपन्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या रायानिक खतांचे दर कमी झाले असून नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याच कृषी सेवा केंद्राने जादा दराने खतविक्री करू नये; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. त्यानुषंगाने खत विक्री प्रक्रियेवर भरारी पथकाचे लक्ष असणार आहे.

खताची गुणवत्ता व दर्जा उत्तम असल्याची हमी देऊन भेसळीद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कृषी सेवा केंद्रांनी हा प्रकार कदापि करू नये. शेतकऱ्यांनीही रासायनिक खत विक्रेत्यांकडे असलेल्या ई-पॉस मशीनद्वारे मिळालेली खत खरेदीची पावती जपून ठेवावी. त्यावरून रासायनिक खताच्या किमतीची पडताळणी करता येईल, अशी सूचना देण्यात आली आहे.

...............

ऐन हंगामात ‘डीएपी’चा तुटवडा

१ मेपासून रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गतवर्षी १२०० रुपयांना मिळणारी गोदावरी डीएपी खताची गोणी १९०० रुपयांवर पोहोचली होती. त्यामुळे शेतकरी ‘गोदावरी’ची मागणी करणार नाहीत, हे गृहीत धरून कृषी सेवा केंद्रांनी डीएपी कमी व २०:२०:०:१३ खताचा अधिक साठा केला. २० मेपासून मात्र डीएपीचे दर उतरून १२०० झाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून याच खताची मागणी केली जात आहे; मात्र या खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसोबतच कृषी सेवा केंद्रांचे चालकही वैतागले आहेत.

.......................

कोट :

जिल्ह्यात गोदावरी डीएपीला पर्याय म्हणून इतर मिश्र खतांचा १३०० मे. टन साठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हे खत दिल्याने उत्पन्नात कुठलीच कमी येणार नाही; मात्र शेतकऱ्यांकडून ‘डीएपी’चाच अट्टहास धरला जात आहे. कच्चा मालाची कमतरता आणि इतर कारणांमुळे आणखी काही दिवस गोदावरी डीएपी उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे.

- विकास बंडगर,

कृषी विकास अधिकारी, जि.प., वाशिम