शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

खरीप पीककर्ज पुनर्गठनाला बँकांची दांडी

By admin | Updated: July 28, 2014 01:51 IST

बँक ऑफ इंडिया रिसोड शाखेचा अपवाद वगळता उर्वरीत बँक व्यवस्थापनाने पीककर्ज पुनर्गठनाला दांडी.

संतोष वानखडे /वाशिमगारपीटीने गारद झालेल्या आणि आता कोरड्या दुष्काळाच्या सावटाने घामाघूम होणार्‍या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मानगुटीवर खरिप पीककर्जाचे अव्वाच्या सव्वा व्याजाचे भूत बसण्याची शक्यता बळावली आहे. बँक ऑफ इंडिया रिसोड शाखेचा अपवाद वगळता उर्वरीत बँक व्यवस्थापनाने २0१३-१४ या सत्रातील खरीप पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याला चक्क दांडी मारल्याने, जिल्हा प्रशासनाने केलेली जनजागृतीही वांझोटीच ठरत आहे.२0१३ मधील अतवृष्टी आणि २0१४ च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यातील गारपीटीने शेतकर्‍यांच्या हिरव्या स्वप्नावर पाणी फेरले. गारपीटीने नुकसान केलेल्या शेतकर्‍यांना दिलासा म्हणून शासनाने मार्च २0१४ मध्ये काही निर्णय जाहिर केलेले आहेत. जे बाधित शेतकरी पीक कर्जाच्या परतफेडीस ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत मुदतवाढीचा लाभ घेतील, असे शेतकरी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजनेस पात्र राहतील. ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत पीककर्जाचा भरणा करणार्‍या शेतकर्‍यांना ह्यथकबाकीदारह्ण समजण्यात येऊ नये, बाधित शेतकर्‍यांच्या शेती पीक कर्जाचे तीन वर्षाचे म्हणजेच २0१४-१५, २0१५-१६ व २0१६-१७ या कालावधीकरिता पुनर्गठन करण्यात येईल, पुनर्गठनाचा लाभ घेणारे शेतकरी सन २0१४-१५ या हंगामात पीक कर्ज घेण्यास पात्र ठरतील, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व बँकांनी तंतोतंत पालन करावे, बाधित क्षेत्रातील कोणतेही पात्र शेतकरी २0 मार्च २0१४ च्या शासन निर्णयातील उपाययोजनांच्या लाभांपासून वंचित राहणार नाहीत, याची सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दक्षता घ्यावी, या आदेशांची जिल्हास्तरावर तातडीने अंमलबजावणी करावी, आदी आदेश मार्च २0१४ मध्ये शासनाने जारी केलेले आहेत. मात्र, या आदेशांना वाशिम जिल्ह्यात पायदळी तुडविले जात आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांनी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या दरबारात गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी केली होती. यावर जिल्हाधिकार्‍यांनी अग्रणी बँकेचे अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांवर पुनर्गठण करण्याची जबाबदारी सोपविली होती. तालुकानिहाय जनजागृती मेळावेही घेतले होते. मात्र, यामधून केवळ बँक ऑफ इंडियाच्या रिसोड शाखेने बोध घेऊन गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या खरीप पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचा मान मिळविला आहे.