शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये होणार स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आगामी काही दिवसांत जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचा जागर करू, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाला ...

वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आगामी काही दिवसांत जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचा जागर करू, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाला त्यात विशेष प्राधान्य असेल, अशी ग्वाही जिल्हाभरातील ग्रामपंचायत सरपंचांनी दिली. जिल्हास्तरीय स्वच्छता संवाद उपक्रमांतर्गत २५ सप्टेंबर रोजी आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात स्वच्छताविषयक कामांचा ऊहापोह झाला. त्यात सरपंचांनी हा निर्धार बोलून दाखविला.

याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम म्हणाले की, जिल्ह्यात २५ ऑगस्टपासून १०० दिवसांचे ‘स्थायित्व व सुजलाम् अभियान’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत स्थानिक पातळीवर लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हागणदारीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे होण्याकरिता सांडपाणी व्यवस्थापन आणि शोषखड्ड्यांची निर्मिती केली जाणार आहेत. या प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

संवाद उपक्रमात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनीही संवाद साधला. ते म्हणाले, जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी व प्रत्येक घरी नळजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छताविषयक कामे सरपंचांच्या सहभाग व सहकार्याशिवाय शक्य नाहीत, असे ते म्हणाले. सरपंच संघटनेचे अध्यक्ष मिटकरी, पारवा ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल लुंगे यांच्यासह इतर सरपंचांनी चर्चेत सहभाग घेऊन जिल्हाभरात स्वच्छताविषयक कामांचा जागर करण्याचा निर्धार बोलून दाखविला. यावेळी माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे, मूल्यांकन व संनियंत्रण सल्लागार विजय नागे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे, आदींनी मार्गदर्शन केले.