पोलीस अधीक्षक वसंत परदेशी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पोलीस अधीक्षक कार्यालय येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पाटकर, वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर, शहर वाहतूक शाखेचे मोहोड, जयाकांत राठोड, एस. आर. पगार, एस. ए. सोयगावकर, एस. जी. पल्लेवाड व विभागीय नियंत्रक विनाेद इलामे यांची उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक कार्यालय येथून पोलीस स्टेशन चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुनी नगरपरिषद, शिवाजी चौक, पाटणी चौक, अकोला नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय येथून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आल्यानंतर श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅलीचे स्वागत केले. पोलीस विभाग, परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त दुचाकी रॅलीद्वारे हेल्मेट वापराबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST