शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तेरवीचा खर्च टाळून दिव्यांग बालकांना अन्नदान

By admin | Updated: September 22, 2016 01:20 IST

अजयसिंह ठाकूर यांनी निर्माण केला आदर्श; परंपरागत चालीरिती व रुढीला दिला फाटा.

वाशिम, दि. २१- अनादी काळापासून चालत आलेल्या रुढी, परंपरांना फाटा देत स्थानिक शुक्रवारपेठ भागातील महाराणा प्रताप चौकातील रहिवासी युवक अजयसिंह ठाकूर यांनी आपले वडील स्व. गिरधरसिंह ठाकूर यांच्या तेरवीचा कार्यक्रम न करता तेरवीच्या दिवशी अंध, दिव्यांग बालकांना अन्नदान करुन वेगळा पायंडा पाडला.सामाजिक कार्यकर्ते व राणा मित्रमंडळाचे अध्यक्ष अजयसिंह ठाकूर यांचे वडील गिरधरसिंह ठाकूर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. हिंदू संस्कृतीत व्यक्तीच्या निधनानंतर काही धार्मिक सोपस्कार पार पाडणे गरजेचे असल्याचे मानले जाते. प्रत्यक्षात आप्तेष्ट जिवंत असताना त्यांच्या आरोग्यावर, खाण्या-पिण्यावर खर्च करण्यासाठी मागेपुढे पाहणारे व्यक्ती त्यांच्या निधनानंतर मात्र तेरवीसारख्या कार्यक्रमात मोठय़ा प्रमाणात खर्च करतात. याला अपवाद ठरत अजयसिंह ठाकूर यांनी वडिलांच्या तेरवीचा कार्यक्रम न करता २0 सप्टेंबरला गोबरा नाईक अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान केले. या अन्नदान कार्यक्रमामध्ये अजयसिंह ठाकूर यांच्या समाजपयोगी कार्यात प्रत्यक्ष सहभाग देत त्यांचे मोठे भाऊ संजयसिंह ठाकूर, चेतनसिंह चौहान, दिलीपसिंह राजपूत, राधेश्यामसिंह ठाकूर, मुकेशसिंह ठाकूर, महादेव हरकळ, अशोक धोंगडे, गोविंदसिंह तोमर, पुरुषोत्तम धोंगडे, राहुल तुपसांडे, गणेश कांबळे, शुभम चौहान, अमित ठाकूर, जफर मिस्त्री यांच्यासह राणा मित्र मंडळ व राजपूत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले.