शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

१२३ प्रकल्पांत सरासरी १२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:58 IST

वाशिम : यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका प्रकल्पांतील जलसाठय़ांना बसत आहे. जिल्ह्यात एकूण १२३ लघु प्रकल्पात सरासरी केवळ १२ टक्के तर तीन मध्यम प्रकल्पात सरासरी केवळ २३ टक्के जलसाठा असल्याची नोंद पाटबंधारे विभागाच्या दप्तरी आहे. गतवर्षी याच कालावधीत यापैकी ५७ प्रकल्प ओव्हरफ्लो तर लघु प्रकल्पात सरासरी ७१ टक्के जलसाठा होता.

ठळक मुद्देगतवर्षी होते ५७ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ तब्बल ६0 प्रकल्पांत शून्य जलसाठामध्यम प्रकल्पांत सरासरी २३ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका प्रकल्पांतील जलसाठय़ांना बसत आहे. जिल्ह्यात एकूण १२३ लघु प्रकल्पात सरासरी केवळ १२ टक्के तर तीन मध्यम प्रकल्पात सरासरी केवळ २३ टक्के जलसाठा असल्याची नोंद पाटबंधारे विभागाच्या दप्तरी आहे. गतवर्षी याच कालावधीत यापैकी ५७ प्रकल्प ओव्हरफ्लो तर लघु प्रकल्पात सरासरी ७१ टक्के जलसाठा होता.वाशिम जिल्ह्यात एकूण १२६ प्रकल्प असून, यामध्ये तीन मध्यम व १२३ लघु प्रकल्प आहेत. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसात सातत्य नाही तसेच प्रकल्प परिसरात दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, प्रकल्पांतील जलसाठय़ात अपेक्षित वाढ नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत एकबुर्जी प्रकल्पाने १00 टक्क्याचा आकडा गाठून सांडव्यावरून पाणी वाहत होते. मध्यम प्रकल्प असलेल्या सोनलमध्ये आज रोजी केवळ एक टक्के जलसाठा आहे. गतवर्षी सोनल प्रकल्पात ८0 टक्के जलसाठा होता. मध्यम प्रकल्प असलेल्या अडाण प्रकल्पात आज रोजी २९ टक्के जलसाठा असून, गतवर्षी याच कालावधीत ६२.३६ टक्के जलसाठा होता.वाशिम तालुक्यातील ३२ लघु प्रकल्पात सरासरी केवळ चार टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत सरासरी ४८.३४ टक्के जलसाठा होता. मालेगाव तालुक्यातील २२ प्रकल्पांत सरासरी आठ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत सरासरी ५४.८७ टक्के जलसाठा होता. रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांत सरासरी १६ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत १८ टक्के जलसाठा होता. मंगरुळपीर तालुक्यातील १५ प्रकल्पांत सरासरी नऊ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत ७३.0७ टक्के जलसाठा होता. मानोरा तालुक्यातील २३ प्रकल्पात सरासरी २0 टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत ७९.५३ टक्के जलसाठा होता. कारंजा तालुक्यातील १५ प्रकल्पांत सरासरी २२ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत  ५५.0६ टक्के जलसाठा होता.जिल्ह्यात एकूण ६0 प्रकल्पांत शून्य जलसाठा असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील प्रकल्पांची संख्या सर्वाधिक आहे. वाशिम तालुक्यातील २६, मालेगाव तालुक्यातील नऊ, रिसोड तालुक्यात १२, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातील प्रत्येकी सहा आणि कारंजा तालुक्यातील एक अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

वाशिम तालुक्यातील प्रकल्पांतील जलसाठय़ाची स्थिती भयावहयावर्षी वाशिम तालुक्यात अल्प पाऊस झाल्याने प्रकल्पांत अत्यल्प जलसाठा असल्याचे दिसून येते. वाशिम तालुक्यात १0 बॅरेजेसची कामे झाली आहेत; मात्र दमदार पाऊस नसल्याने पैनगंगा नदीला पूर गेला नाही. परिणामी, सर्वच बॅरेजमध्ये उपलब्ध उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. दमदार पाऊस झाला नाही तर रब्बी हंगामात सिंचन कसे करावे? या चिंतेने बॅरेज परिसरातील शेतकर्‍यांची झोप उडाली आहे.

जलपातळीतही घट !पावसाने दडी मारल्याने जलपातळीत घट येत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना बसत आहे. पावसात सातत्य नसल्याने विहिरींत पुरेशा प्रमाणात जलसाठा आला नाही. त्यामुळे काही गावांत पाणीपुरवठा आठ दिवसांवर गेला आहे.