शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांचे ऑडिटिंग; १३ लाख रुपये केले परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:50 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांकडून विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारल्यासंबंधी शासनस्तरावर तक्रारी ...

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांकडून विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारल्यासंबंधी शासनस्तरावर तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे नगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर भरारी पथकांची नेमणूक करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. त्यानुसार, वाशिम शहरातील २२ रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या देयकांवर लक्ष ठेवले जात आहे. सदर रुग्णालयांमध्ये दाखल कोरोना बाधित रुग्णांच्या देयकांची तपासणी करणे व विहित दरानुसार दर आकारणी केली जाते किंवा नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी पथक प्रमुखांवर सोपविण्यात आलेली आहे.

दरम्यान, आतापर्यंत वाशिममधील एकमेव सेक्युरा हाॅस्पिटलच्या तपासणीत ५७१ रुग्णांच्या देयकात त्रुटी आढळून आल्या.

..............

अशी आहे आकडेवारी

२२

कोरोनावर उपचार केले जाणारे शहरातील हाॅस्पिटल

२०

जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले ऑडिटर्स

५७१

बिल जास्त घेतल्याच्या तक्रारींची संख्या

..................

रुग्णालयांची कसून तपासणी

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या वाशिम शहरातील २२ रुग्णालयांची नियुक्त ऑडिटर्सकडून कसून तपासणी केली जात आहे.

रुग्णालयांकडून आकारण्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाच्या देयकाची व तक्रारदार रुग्णांच्या देयकांचीही तपासणी यादरम्यान केली जाणार आहे.

..................

३२५ जणांना मिळाले पैसे

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत वाशिममध्ये सेक्युरा हाॅस्पिटलला कोविड केअर हाॅस्पिटलचा दर्जा देण्यात आला होता.

या रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांकडून अवाजवी देयक आकारल्याप्रकरणी सेक्युरा हाॅस्पिटलची तपासणी करण्यात आली. यासंदर्भातील ५७१ प्रकरणांपैकी ३२५ प्रकरणे निकाली काढून संबंधितांना १३ लाखांपेक्षा अधिक रक्कम परत करण्यात आली.

................

कोट :

शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करून खासगी कोविड हाॅस्पिटलकडून कोरोना बाधितांकडून आकारण्यात आलेल्या देयकांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. यापूर्वी पहिल्या लाटेत झालेल्या तपासणीदरम्यान सेक्युरा हाॅस्पिटलने आकारलेल्या देयकांमध्ये त्रुटी आढळून आल्या. ५७१ जणांचे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ३२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

- शन्मुगराजन एस.

जिल्हाधिकारी, वाशिम.