शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑडिट’ची धास्ती; सुटीतही कार्यालये सुरू

By admin | Updated: January 25, 2016 02:12 IST

आयुक्त कार्यालयाच्या पथकाद्वारे ‘ऑडिट’ सुरू; साफसफाईसह विविध कामे युद्धपातळीवर.

संतोष वानखडे / वाशिम: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामीण) कारभाराची चिरफाड करणारी पंचायत राज कमिटी (पीआरसी) वाशिम जिल्हय़ाच्या तपासणीवर लवकरच येणार आहे. दरम्यान, २७ जानेवारीपासून आयुक्त कार्यालयाचे पथक ह्यऑडिटह्णसाठी जिल्हा परिषदेत दाखल होणार आहे. तपासणीदरम्यान काही गंभीर त्रुट्या निदर्शनात येऊ नये याची दखल म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन कामाला लागले असून, शनिवार व रविवार या दोन दिवशी सुटी असतानाही बहुतांश कार्यालये सुरू होती. ग्रामीण भागात विकासाची गंगा पोचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामीण) ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या तीन घटकांची निर्मिती करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार भरकटू नये म्हणून तपासणी व ऑडिट करण्यासाठी पंचायत राज कमिटी (पीआरसी) गठित करण्यात आली. शासनाने नियुक्त केलेली पीआरसी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या कार्यालयांना भेटी देऊन कामकाजाचे ऑन दी स्पॉट ऑपरेशन करते. पंचायत राज समितीत उच्चपदस्थ अधिकारी व राज्य विधिमंडळाचे लोकप्रतिनिधी अशा २५ जणांचा समावेश असून, गत आठवड्यात बुलडाणा जिल्हय़ाच्या दौर्‍यावर सदर पथक होते. बुलडाणानंतर उस्मानाबाद जिल्हय़ात सदर पथक गेले असून, त्यानंतर विदर्भातील काही जिल्हय़ांचा नंबर लागण्याची शक्यता आहे. पीआरसी येण्यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे महत्त्वाचे मुद्दे, विषय आणि ऑडिट या तीन प्रमुख बाबी मंत्रालयाकडे पाठविल्या जातात. तेथे छाननी झाल्यानंतर पीआरसीचा दौरा कधीही निश्‍चित होऊ शकतो. वाशिम जिल्हा परिषदेतर्फे महत्त्वाचे मुद्दे, विषय व ऑडिट मंत्रालयाकडे पाठविण्याची बाब अंतिम टप्प्यात असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. यानंतर पीआरसीचा ताफा वाशिम जिल्हय़ात कधीही येऊ शकतो. पीआरसी आणि आयुक्त कार्यालयाच्या ऑडिट पथकाची धास्ती घेऊन सुटीच्या दिवसातही स्थानिक स्वराज्य संस्थेची (ग्रामीण) अनेक कार्यालये कामकाजात व्यस्त असल्याचे दिसून येते.