शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या जागावाटपाकडे लक्ष

By admin | Updated: August 21, 2014 23:05 IST

भाजपा, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही लागली कामाला

वाशिम : वाशिम विधानसभा मतदार संघात यावेळी भाजपा, काँग्रेसमध्ये दुहेरी लढत होण्याची चिन्हे असून यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही कामाला लागल्याने तिहेरी लढतीचे संकेत प्राप्त झाले आहेत. गत निवडणुकीत या मतदार संघात दुहेरी लढत झाली होती. सद्याच्या स्थितीत तीनही पक्ष आपआपल्या परिने कामाला लागले आहेत. भाजपाकडे ताब्यात असलेला हा मतदार संघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने जबरदस्त फिल्डींग चालविली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याही बैठकी सुरू झाल्या असून तीनही मतदार संघात त्यांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे तर काँग्रेस सद्यास्थितीत सर्वच बाबतीत आघाडीवर दिसून येत आहे. काँग्रेसच्यावतिने इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती मुंबई येथे आटोपल्या आहेत. भाजपामध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू असून पक्षातच आरोप प्रत्यारोपास सुरूवात झाल्याने उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत सांशकता निर्माण झाली आहे. काँग्रेसचा येथे यापूर्वी पराभव झाल्याने हा मतदार संघ राष्ट्रवादीकडे सोडण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतपर्फे सोडण्याची मागणी होत असून या मतदार संघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची यादी सुध्दा तयार झाली आहे. तसेच भाजपाकडे असलेल्या या मतदार संघावर शिवसेनेच्यावतिनेही दावा करण्यात येत आहे. या सर्व भानगडीमुळे महायुतीच्या जागा वाटपाकडे मतदार संघाचे लक्ष लागले असून भाजपाचा व काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार याची कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. वाशिम विधानसभा मतदार संघात १९९0 पर्यंत निर्विवाद काँग्रेसचे अस्तित्व होते त्यानंतर भाजपाने याला खिंडार पाडून सत्ता आपल्या ताब्यात घेतली. यानंतर मात्र पाळीपाळीने कॉंग्रेस- भाजपा ने निवडणुकीत विजय मिळविला. गत निवडणुकीत भाजपा उमेदवाराला काँग्रेसच्यावतिने जबरदस्त टक्कर देण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला होता. यावेळी सर्वच पक्षाच्यावतिने प्रबळ उमेदवार देण्याचे बोलल्या जात असल्याने सद्यातरी निवडणुक दुहेरी की तिहेरी होईल हे सांगता येत नसले तरी मतदारसंघातील वातावरण पाहता दुहेरी लढत होण्याची शक्यता आहे. मनसेचे इंजीन जोराने धावण्यास सुरूवात झाल्याने याचा परिणाम या निवडणुकीवर जाणविण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिपाइं आठवलेही निवडणूक लढण्यास इच्छूक असून त्यांनीही उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना वाशिम-मंगरुळपीर हय़ा राखीव मतदारसंघात काही पक्षात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अद्याप जागा वाटपाचेच बहुसंख्य इच्छुकांमुळे रेंगाळलेले दिसून येत आहेत. सन २00९ साली परिसीमन आयोगाने केलेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघ संपुष्टात येउन नव्याने वाशिम-मंगरुळपीर या मतदारसंघाची निर्मिती झाली. तसेच सदरचा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता राखीव झाला असून यामध्ये इच्छुकांची गर्दी राजकीय पक्षांची डोकदुखी ठरत आहे. प्रसंगी स्वबळावर लढण्याच्या वल्गना दोन्ही काँग्रेसचे नेते करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा ठोकला असून राष्ट्रवादी कडे इच्छूक उमेदवार तयार आहेत. याचबरोबर मनसे, भारिप, भाजपा या पक्षांनीसुद्धा अद्याप त्यांचे उमेदवार घोषीत केले नसले तरी या पक्षातील इच्छूकांची संख्या मात्र सर्वच पक्षात मोठी दिसून येत आहे.सद्याच्या स्थितीत तीनही पक्ष आपआपल्या परिने कामाला लागले आहेत.