शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

अध्यक्षपदाच्या निवडणूक तारखेकडे लक्ष

By admin | Updated: June 17, 2016 02:30 IST

वाशिम जिल्हा परिषदेचा ३0 जूनला अडीच वर्षांंचा कार्यकाळ संपणार; मोर्चेबांधणीला आला वेग.

वाशिम: जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीची तारीख कधी घोषित होणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षांचा अडीच वर्षांंचा कालावधी येत्या ३0 जून रोजी संपणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २0१३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने युती केली तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अपवाद वगळता अन्य पक्षांना दोन अंकी आकडाही गाठला आला नाही. १७ जागा घेऊन काँग्रेस हा पक्ष जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. ऐन निवडणुकीच्या काळातच गटबाजी उफाळून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार व भारिप-बमसं तीन असे पक्षीय बलाबल राहिले. अध्यक्ष व सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा अडीच वर्षांंचा कार्यकाळ येत्या ३0 जून रोजी संपत असल्याने आता निवडणूक होणार आहे. निवडणुकीची तारीख काय? याकडे सर्वांंचे लक्ष लागून आहे. दरम्यान, २0१४ मधील विधानसभा निवडणुकीने जिल्हा परिषद सदस्य संख्येतही उलथापालथ केली. जि.प. सदस्य विश्‍वनाथ सानप दाम्पत्य मनसेतून शिवसेनेत दाखल झाल्याने सेनेचे संख्याबळ १0 झाले तर मालेगाव जिल्हा परिषद गट बाद झाल्याने मनसेचे संख्याबळ एक वर आले. २0१३ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद एस.सी. महिला प्रवर्गासाठी राखीव होते. अध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या सोनाली जोगदंड तर उपाध्यक्ष म्हणून राकाँचे चंद्रकांत ठाकरे हे कामकाज पाहत आले आहेत. आता सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अध्यक्षपदाची आरक्षण सोडत निघाल्याने चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसकडे स्वत:चे १७ आणि दोन अपक्ष असे १९ संख्याबळ आहे तर मित्र पक्ष असलेल्या राकाँकडे आठ सदस्य असल्याने काँग्रेस-राकाँ-अपक्ष ही आघाडी पुन्हा विराजमान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, शिवसेना व भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषदेत सत्तापालट करण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणीला वेग दिल्याने आणि सोबतीला एका पक्षाच्या ह्यबह्ण गटाशी बोलणी सुरूच ठेवल्याने ऐनवेळी धक्कादायक निकाल येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.