शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीकडून हत्येची कबुली

By admin | Updated: May 20, 2017 01:41 IST

पसरणी उपसरपंच हत्या प्रकरण : हत्येमागील कारणे व खऱ्या सूत्रधाराचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: तालुक्यातील पसरणी येथील ३८ वर्षीय उपसरपंच विलास पोटपिटे यांच्या हत्येप्रकरणात १८ मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मेहबूब मदन चौधरी याने हत्येची कबुली दिली आहे. या हत्या प्रकरणात कोण कोण खरे सूत्रधार आहेत, खुनाचे नेमके कारण काय, या गोष्टीचा शोध घेण्यासाठी कारंजा पोलीस तपास करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी दिली.अटक केलेल्या आरोपीकडून हत्येमागील कारणे व खरा सूत्रधार शोधण्याच्या तपास सुरू आहे. येत्या दोन दिवसात पसरणी उपसरपंच विलास पोटपिटे यांच्या खुनामागील खरा सूत्रधार पुढे येईल, असा विश्वास पोलीस विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विलास पोटपिटे यांचा खून वेगळ्या पद्धतीने करून त्यांचा मोबाइल व इतर कागदपत्रे घटनास्थळाहून काही अंतरावर म्हणजेच इंझोरी रस्त्यावरील पुलावर फेकून दिल्याची माहिती देणाऱ्या पसरणी येथील मेहबूब मदन चौधरी या युवकाला १८ मे रोजी अटक केल्यामुळे खरा खुनी कोण व कशासाठी विलास पोटपिटे यांचा खून झाला हे शोधणे पोलिसांना कठीण नसल्याचे बोलल्या जात आहे; मात्र या खुनामागे राजकीय प्रतिष्ठितांचा सहभाग असल्याच्या सुगाव्यामुळे पोलीस गुप्तता पाळत असताही पोलिसावर राजकीय दबात येत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. तथापि, पोलिसांना या घटनेचे गूढ उकलण्यात यश आले असून, हत्या घडवून आणण्यात कुणाकुणाचा सहभाग होता, हत्येमागील खरे कारण काय होते, याचा शोध पोलीस घेत आहे.कारंजा पोलिसांनी अटक केलेल्या महेबूब चौधरी याच्या सांगण्यानुसार पोलिसांनी चार ते पाच व्यक्तीची कसून चैकशी केली. दरम्यान, त्याला १८ मे रोजी न्यायालयात हजर केले असता विद्यमान न्यायाधीशांनी त्याला २३ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.वाशिम पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले तपास करीत आहे. यांना पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन व पोलीस कर्मचारी सहकार्य करीत आहे.