शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अशोक पखाले यांचा मृतदेह मिळाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:43 IST

मालेगाव: भारत मुक्ती मोर्चाचे  जिल्हा अध्यक्ष अशोक पखाले हे  तालुक्यातील कोल्ही येथील लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या तलावात  गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होते. शुक्रवार, २५ ऑगस्ट दुपारी  प्रकल्पातील पाण्यात त्यांचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला  यश मिळाले. 

ठळक मुद्देपिंजरच्या पथकाचे सर्च ऑपरेशन..गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होते

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: भारत मुक्ती मोर्चाचे  जिल्हा अध्यक्ष अशोक पखाले हे  तालुक्यातील कोल्ही येथील लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या तलावात  गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होते. शुक्रवार, २५ ऑगस्ट दुपारी  प्रकल्पातील पाण्यात त्यांचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला  यश मिळाले. भारत मुक्ती मोर्चाचे कार्य करण्यापूर्वी पखाले हे आठ वर्षे भारिप- बमसंचे मालेगाव तालुका अध्यक्ष होते. ते दररोज कोल्ही तलावात  पोहण्यासाठी जात होते. गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान ते  पोहण्यासाठी मित्रांसमवेत तलावावर गेले; मात्र अस्वस्थ वाटत  असल्याने त्यांनी पोहण्याऐवजी काठावर बसून आंघोळ करणार  असल्याचे मित्रांना सांगितले होते. त्यामुळे बाकीचे पोहण्यासाठी  तलावात गेले. परत आले तर त्यांना पखाले तिथे दिसले नाहीत.  त्यांनी घटनेची माहिती पखाले यांच्या नातेवाइकांना व पोलिसांना  दिली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूसह पिंजर येथून  संत गाडगेबाबा  आपत्कालीन  शोध व बचाव पथकाने  गुरुवारी  रात्री ७ वाजेपर्यंंत प्रकल्पात शोध कार्य चालू ठेवले होते; मात्र ते  आढळले नव्हते. शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून  संत  गाडगेबाबा  आपत्कालीन  शोध व बचाव पथकाने   शोध कार्य  हाती घेतले. दुपारी २ वाजतादरम्यान पखाले यांचा मृतदेह  शोधण्यात पथकाला यश आले. सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पा िर्थवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी,  एक मुलगा, दोन मुली, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.

पिंजरच्या पथकाचे सर्च ऑपरेशन..कोल्ही येथील धरणात अशोक पखाले बेपत्ता झाल्याची माहिती  मिळाल्यावरून पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व  बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे हे आपल्या चमूसह  घटनास्थळी दाखल झाले. पथक प्रमुख दीपक सदाफळे, सागर  आटेकर, आकाश राऊत, अंकुश  सदाफळे, अतुल उमाळे,  ऋषिकेश  तायडे, राजेश इंगळे, गोपाल उमाळे, ऋतिक  सदाफळे,  गोपाल राऊत, सचिन बंड, महेश साबळे यांनी लगेच सर्च ऑ परेशन सुरू केले. शुक्रवारी दीपक सदाफळे यांनी ‘डीप डायव्हिंग’  व  ‘स्विमिंग’ पद्धत वापरून २७ फूट खोल पाण्यातून अशोक  पखाले यांचा मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळी तहसीलदार  राजेश वझिरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे,  पोलीस अधिकारी उपस्थित होते.