शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अरुणावती कोरडी; दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST

................. वाशिम शहरातील बाजारपेठेत गर्दी वाशिम : शहरातील बाजारपेठेत शनिवारी विविध साहित्य खरेदीसाठी सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे ...

.................

वाशिम शहरातील बाजारपेठेत गर्दी

वाशिम : शहरातील बाजारपेठेत शनिवारी विविध साहित्य खरेदीसाठी सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात असल्याचेही यावेळी दिसून आले.

...............

शहर स्वच्छतेकडे न.प.चे विशेष लक्ष

वाशिम : शहरातील विविध प्रभागांमधील कचरा नियमित उचलून नेण्यासह सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांच्या स्वच्छतेकडे न.प.ने विशेष लक्ष पुरविणे सुरू केले आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

...............

ग्रा.पं.कडे कोट्यवधींची विद्युत देयक थकबाकी

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व विद्युत पथदिव्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. ही रक्कम अदा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी केले आहे.

..............

वाशिम शहरातील दुकानांची तपासणी

वाशिम : शहरी भागातील आस्थापना, दुकानांच्या तपासणीसाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून शनिवार, दि. २९ मे रोजी तपासणी करण्यात आली. विनामास्क आढळलेल्या नागरिकांना दंड ठोठावण्यात आला.

...............

‘ते’ कर्मचारी अद्याप मानधनाविना

वाशिम : चालूवर्षी जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या कामासाठी नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप मानधन मिळालेले नाही. निवडणूक विभागाने ते अदा करावे, अशी मागणी होत आहे.

........................

सेवा भवन उभारण्याची मागणी

वाशिम : विविध स्वरूपातील सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणून सेवा भवन उभारण्यात यावे, अशी मागणी मोहजा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारेे केली.

...........................

शेकडो शेतकरी मदतीपासून वंचित

वाशिम : परिसरात गतवर्षी परतीच्या पावसामुळे हजारो एकरावरील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असताना अनेकांना अद्याप मदत मिळालेली नाही. प्रशासनाने लक्ष पुरवून मदत करावी, अशी मागणी होत आहे.

..............

नियमाचे उल्लंघन; दंडात्मक कारवाई

वाशिम : दुचाकीवरून तिबल सीट प्रवास करणाऱ्या जवळपास २० जणांवर गत दोन दिवसांत पोलिसांनी कारवाई केली. वाशिम ते कनेरगाव या रस्त्यावर पोलिसांची चमू कारवाईसाठी तळ ठोकून असल्याचे दिसून येत आहे.

..............

कोरोना चाचणी करण्याचे आवाहन

वाशिम : कोरोना रुग्णांची संख्या आता घटत चालली आहे. असे असले तरी सर्दी, ताप, खोकला, घसादुखी आदी लक्षणे असणाऱ्यांनी तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

..............

तलाठ्यांना स्वतंत्र कार्यालयाची मागणी

वाशिम : गावपातळीवरील महसूल विभागाचा कणा असलेल्या तालुक्यातील सुमारे ३० तलाठ्यांना बसण्याकरिता कार्यालय आवश्यक आहे. त्यासाठी मात्र स्वतंत्र जागा व इमारत नाही. ही व्यवस्था देण्याची मागणी तलाठ्यांमधून होत आहे.

............

नदीवरील पुलाच्या दुरुस्तीची मागणी

वाशिम : मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी या गावावरून मेडशीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नदीवर असलेला पूल धोकादायक अवस्थेत आहे. पावसाळ्यात यामुळे पूरपरिस्थिती उद्भवते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.