शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनी मास्क वापरण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST

............... धूरमुक्त अभियानाला बसली खीळ वाशिम : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढच होत आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक ...

...............

धूरमुक्त अभियानाला बसली खीळ

वाशिम : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढच होत आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट विस्कळीत झाले आहे. यासह उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळालेल्या बहुतांश महिलांनी दरवाढीमुळे गॅसचा वापर बंद केल्याने धूरमुक्त अभियानाला खीळ बसली आहे.

.............

अवैध रेती वाहतूक नियंत्रणाबाहेर

वाशिम : जिल्ह्याबाहेरील वाहनांमधून अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत असून, अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी युवकांनी तहसीलदारांकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.

...........

ऑॅनलाईन शिक्षणात इंटरनेटचा खोडा

वाशिम : ऑॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी ॲन्ड्रॉईड मोबाईलची गरज आहे. तो विकत घेण्यासाठी ऐपत नसतानाही अनेकांनी पदरमोड करून मोबाईल विकत घेतला आणि त्यात सिमकार्ड घालून शिक्षण सुरू झाले; मात्र वारंवार नेटवर्क जाणे, गती न मिळणे यांसह अन्य अडचणींमुळे शिक्षणात खोडा निर्माण झाल्याचे दिसत आहे.

...............................

महिलांना मधुमक्षिका पेट्यांची प्रतीक्षा

वाशिम : गतवर्षी कोरोना संकट उद्भवण्यापूर्वी बचतगटातील महिलांना मधुमक्षिका पेट्या मिळाल्या; मात्र अपेक्षित फायदा झाला नाही. मध्यंतरी पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले. असे असताना आता महिलांना मधुमक्षिका पेट्या मिळण्याची प्रतीक्षा लागून आहे.

...............

२६ गावांमध्ये बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित

वाशिम : जिल्ह्यात या वर्षी २६ गावांमध्ये बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्याचा वापरही सुरू झाला असून, मूळ उद्देश साध्य झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी दिली.

..............

अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी

वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झाले; मात्र अल्पावधीतच रस्ते खराब होऊन त्यांची दुरवस्था झाली आहे. काही रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून त्यांत पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

.............

वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण

वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झाले असून, काही लोकांनी जमीन वहितीखाली आणली आहे. त्याचा शोध घेऊन अतिक्रमण हटवावे, अशी मागणी वृक्षप्रेमी माधवराव मारशेटवार यांनी केली.

.............

महामार्गावरील वाहतूक जागीच ठप्प

वाशिम : शहरातील पोस्ट ऑॅफिस चौक, हिंगोली नाका, पुसद नाका या ठिकाणाहून गेलेल्या महामार्गावरील वाहतूक रविवारी दुपारच्या सुमारास जागीच ठप्प झाली होती. वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे यावेळी पाहावयास मिळाले.

.............

सौरऊर्जा वापराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वाशिम : अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हणून सौरऊर्जा वापरावर भर देण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र प्रशासकीय कार्यालयांमध्येच त्याचे पालन होत नाही. काही कार्यालयांचा अपवाद वगळल्यास बहुतांश कार्यालयांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे.