शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

‘मित्रासाठी कायपण...!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:30 IST

भर जहागीर ..... पौराणिक कथांमधून आजही मित्रत्वाच्या नात्यांचे अनेक दाखले वाचायला, ऐकायला मिळतात. अशाचप्रकारे भर जहागीर येथील गरीब ...

भर जहागीर ..... पौराणिक कथांमधून आजही मित्रत्वाच्या नात्यांचे अनेक दाखले वाचायला, ऐकायला मिळतात. अशाचप्रकारे भर जहागीर येथील गरीब कुटुंबातील युवकाचा अपघात झाला व त्याच्या उपचारासाठी त्याचे मित्र धावून आले व तब्बल ४५ हजार रुपये जमा केले.

भर जहागीर येथील हलाखीच्या परिस्थितीमधील राधेश्याम सुरूशे या युवकाच्या हातचे काम कोरोना महामारीने हिरावले. गावकुसामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढेसुध्दा रोज मजुरीचे काम हाताला मिळत नसल्याने रोजगाराच्या शोधात गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर कापडसिंगी या गावी जात असताना कुत्रे आडवे आल्याने मोटारसायकलचा अपघात झाला आणि राधेश्यामच्या उजव्या पायाला जबर मार लागला. त्याला वाशिम येथे एका खासगी रुग्णालयामध्ये भरती केल्यानंतर सुमारे दीड लाख खर्च सांगण्यात आला. यासंदर्भात ‘ लोकमत’मध्ये ‘राधेश्यामच्या मदतीसाठी सरसावले सवंगडी’ हे वृत्त प्रकाशित झाले आणि व्हाॅटस्-ॲप ग्रुपच्या माध्यमातून सुमारे चाळीस मित्रांनी शंभर रुपयांपासून ते तब्बल पाच हजार रुपयांच्या वैयक्तिक मदतीसाठी पुढाकार घेतला आणि एकूण चाळीस हजारांची आर्थिक मदत जमा केली. ही रक्कम राधेश्याम सुरूशे यांच्या पत्नीकडे सुपूर्द केली. एवढेच नाही, तर वाशिम येथील खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांनी, काही मित्रांनी संपर्क करीत राधेश्यामच्या हलाखीच्या परिस्थितीची आपबीती मांडल्याने डाॅक्टरांनीसुध्दा ऑपरेशनच्या खर्चामध्ये मोठी कपात करून सहकार्य केले. या मदतीवरून ‘मित्रासाठी कायपण’चा प्रत्यय युवकांनी दाखवून दिला.