मंडळ अध्यक्षपदी संतोष इंगोले व मंडळ सचिव म्हणून प्रशांत भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही बैठक वाशिम येथून ऑनलाईनद्वारे परिमंडळ अध्यक्ष एस. एम. गवई यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय उपाध्यक्ष पी. एल. हेलोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
यावेळी प्रमुखपाहुणे म्हणून परिमंडळ सचिव एस. एम. दारोकार होते.
कार्यकारिणी उपाध्यक्ष पदी रवींद्र गिरी, सहसचिव अतुल पाटील, संघटक नीलेश दिघोडे, कोषाध्यक्ष रविकुमार राठोड, कार्यकारिणी सदस्य संजय मनवर, चंदन चव्हाण, प्रवीण डोगरे श्रीकांत कोल्हे, महिला प्रतिनिधी सुप्रिया खाडे, वंदना अघम, आदींची निवड करण्यात आली आहे.
तसेच विभागीय कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी दिनेश भगत व सचिव म्हणून महेंद्र मनवर यांची निवड करण्यात आली आहे. पुढील कार्यकारिणी , उपाध्यक्षपदी बबन अंभोरे, सहसचिव तुळशीराम गायकवाड, संघटक अविनाश जाधव, कोषाध्यक्ष युवराज मनवर, सदस्यपदी अमोल बावने, महादेव तायडे, विशाखा मेश्राम, वंदना मनवर, मंगेश मोरकर, एस. एम. करडे, प्रवीण राठोड, आदींचा मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटना वाशिम मंडळ व विभागीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न झाली.